Jalgaon News: विद्यार्थ्यांना मिळणार कौशल्य विकासाचे प्रशिक्षण; विद्यापीठाचा त्रिसदस्यीय सामंजस्य करार

Bahinabai Chaudhari uttar Maharashtra University
Bahinabai Chaudhari uttar Maharashtra Universityesakal
Updated on

Jalgaon News : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ‘वर्कप्लेस रेडीनेस प्रोग्रॉम (नोकरीसाठी अत्यावश्यक बाबींची सज्जता) हा महत्त्वाचा पथदर्शी प्रकल्प राबवण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची निवड केली असून यामुळे पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांना इंटर्नशिपची संधी प्राप्त होणार आहे.

याचाच एक भाग म्हणून विद्यापीठ व अॅडव्हान्टेज लिडरशिप सोल्यूशन प्रा. लि. (तलेरंग), मुंबई आणि रैना एज्युकेशन फाउंडेशन, नवी दिल्ली यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार केला जाणार आहे. खानदेशातील विद्यार्थ्यांसाठी हा पथदर्शी प्रकल्प नवी दिशा देणारा ठरणार आहे. (Students will receive skill development training Tripartite Memorandum of Understanding of University jalgaon news)

उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांना नुकतेच पत्राद्वारे या कराराबाबत अवगत केले आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात इंटर्नशिपवर भर देण्यात आला आहे.

प्रायोगिक तत्त्वावर ७० दिवसांसाठी

विद्यार्थ्यांना आवश्यक ती कौशल्य आणि तांत्रिक ज्ञानाने सुसज्ज करून इंटर्नशिप इकोसिस्टीम मजबूत करण्यासाठी राज्यसरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. ‘अर्न्स्ट अॅण्ड यंग’ ही सल्लागार कंपनी राज्य शासनासोबत याबाबतीत काम करीत असून या कंपनीच्या प्रतिनिधींनी विद्यापीठाला नुकतीच भेट देवून हा प्रकल्प राबविण्याबाबत चर्चा केली. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘वर्कप्लेस रेडीनेस प्रोग्रॉम हा पथदर्शी प्रकल्प ७० दिवसांसाठी प्रायोगिक तत्त्वावर चालविला जाणार आहे.

असा असेल प्रशिक्षण कार्यक्रम

पहिल्या टप्प्यात विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी करून त्यांची चाचणी परीक्षा घेतली जाईल. त्यातील कामगिरीवर १० टक्के विद्यार्थ्यांची दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणासाठी निवड केली जाईल.

Bahinabai Chaudhari uttar Maharashtra University
Jalgaon News: मुक्ताईनगर, बोदवड, रावेरच्या शेतकरी, युवकांना कर्ज मिळणार; चंद्रकांत पाटील यांची माहिती

तलेरंग ही संस्था निवड झालेल्या विद्यार्थ्यांना १२ सॉफ्टस्किल्स आणि १४ हार्डस्किल्सचे प्रशिक्षण देईल. ३० दिवस हे प्रशिक्षण दिले जाईल. हे प्रशिक्षण परस्पर संवाद व ऑनलाइन अशा संकरित (हायब्रीड मोड) पद्धतीने दिले जाईल.

विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार शिफारस केलेले १०० तासांची व्हिडिओ सामग्री देखील दिली जाणार आहे. तिसऱ्या टप्प्यात प्रशिक्षणातील १० टक्के विद्यार्थ्यांची उद्योग प्रकल्पांतील इंटर्नशिपसाठी निवड केली जाईल. हे सर्व उद्योग प्रकल्प नामांकित असतील. या प्रशिक्षणात सहभागी विद्यार्थ्यांचे परिचय पत्र (रेझ्युम) अपडेट करण्यासाठी तलेरंगच्या वतीने विद्यार्थ्यांना सहकार्य केले जाईल. त्यासाठी इंटर्नशिप ॲप्लिकेशन विकसित केले जाणार आहे.

तीन हजार मुलांना लाभ

‘वर्कप्लेस रेडीमेड प्रोग्रॉम हा तलेरंग या संस्थेद्वारे विकसित करण्यात आला असून ही संस्था हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये देखील प्रकल्प राबवीत आहे. या प्रकल्पाचा तीन ते साडेतीन हजार विद्यार्थ्यांना लाभ होईल, अशी अपेक्षा असल्याची माहिती कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी दिली.

Bahinabai Chaudhari uttar Maharashtra University
Jalgaon News: जामनेर- बोदवड ‘ब्रॉडगेज’साठी स्थानकाची जागा बदलावी; जिल्हाधिकाऱ्यांचा ‘DRM’ कडे प्रस्ताव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()