Jalgaon News : भरदिवसा कालिंका माता मंदिर चौक स्टेट बँकेत दोघा हेल्मेटधारी दरोडेखोरांनी ३ कोटी ६० लाखांचे सोने आणि १७ लाख ३० हजारांची रोकड लुटून नेली होती.
संपूर्ण महाराष्ट्र पोलिस दलास आव्हान देणाऱ्या बाप -लेक दरोडेखोरांना जळगाव पोलिसांनी दोन दिवसात बेड्या ठोकल्या असून ७० हजारांची रोकड वगळता साडेतीन कोटींचे सोने आणि उर्वरित रोकड हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला आहे. (sub inspector committed robbery with help of his father in law district police force solved crime in two days Jalgaon Crime News)
विशेष म्हणजे दरोडेखोर कर्जत पोलिस दलात कार्यरत रजेवरील उपनिरीक्षक व त्याचा पिता व मेहुणा असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
दरोडेखोरांनी जळगाव शहराच्या बाहेर बँक कर्मचाऱ्यांचे जप्त केलेले मोबाईल तसेच बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर हा एका नाल्यात फेकून दिला होता. त्यानंतर ते पसार झाले होते. पोलिसांनी डीव्हीआर जप्त केला होता.
मात्र, पाणी गेल्यामुळे त्यातून माहिती संकलन करण्यासाठी पोलिसांना मोठ्या अडचणी आल्या. एका ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दुचाकीवरून जात असलेले दोन दरोडेखोर कैद झाले होते.
एवढाच धागा पोलिसांकडे होता आणि याच आधारावर संपूर्ण यंत्रणा काम करत होती. गुन्ह्यात अटक करण्यात आलेला मनोज रमेश सूर्यवंशी हा स्टेट बँकेमध्ये करार पद्धतीने शिपाई म्हणून नोकरीला आहे.
त्याला बँकेतील सर्व गोष्टींची माहिती होती. मुख्य संशयित दीर्घ रजेवरील उपनिरीक्षक शंकर जासक याने १५ दिवसांपूर्वी रेकी करून दरोड्याचा प्लॅन आखला. त्याचे वृद्ध वडील रमेश जासक आणि त्याचा मेहुणा मनोज सूर्यवंशी यांना सोबत हा धाडसी दरोडा टाकल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
या टीमने केली उकल
परीक्षाविधीन पोलिस उपअधिक्षक अप्पासाहेब पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसन नजन पाटील, शनिपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक शंकर शेळके, उपनिरीक्षक गणेश वाघमारे, प्रदीप चांदेलकर, मुबारक तडवी ,परीस जाधव, राहुल पाटील, अनिल कांबळे, राहुल घेटे, विजय निकम, किरण वानखेडे, मुकुंदा गंगावणे, अमोल विसपुते, गिरीश पाटील, अश्विन हडपे, अभिजित सैंदाणे, सुनील पवार यांच्या पथकाने पोलिस अधीक्षक व अप्पर अधीक्षकांसमक्ष बँकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी सुरु केली.
वेगवेगळी विचारपूस करत असताना मनोज सूर्यवंशी याच्या बोलण्यावर शंका आली. तसेच त्याने सीसीटीव्ही डिव्हीआर संशयितांना काढून देत बाहेरपर्यंत पोहचवल्याने त्याची माहिती घेण्यास सुरवात केली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने उपनिरीक्षक पाहुण्याचे नाव सांगितले.
तर या गुन्ह्यातील सहभागी त्याचा पिता ६७ वर्षीय रमेश जाचक याने बँक कर्मचाऱ्यांचे हातपाय बांधण्यास मदत केल्याचे कबुली दिली. मुख्य संशयित मुंबईला पळून गेल्याची खात्री झाल्यावर पोलिस पथकाने त्याचा सलग पिच्छा पुरवून कर्जत येथील त्याच्या घरातून बेड्या ठोकल्या.
तिन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना अटक करून आज जळगाव जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यात रमेश जासक याला न्यायालयीन कोठडी तर शंकर जासक आणि मनोज सूर्यवंशी यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
"गुन्हा घडल्यानंतर सलग ३७ तास तपासात सहभागी एकही अधिकारी कर्मचारी न थकता मिशन दरोड्यावर कार्यरत होता. प्रचंड मेहनत घेत पथकाने गुन्हा उघडकीस आणत महाराष्ट्र पोलिसदलाची इज्जत राखली आहे. सामान्य माणसाचा पोलिस दलावरील विश्वास माझ्या टीमने कायम राखल्याचा मला अभिमान आहे."
- एम. राजकुमार, पोलिस अधीक्षक, जळगाव जिल्हा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.