Success Story : जीवनात स्वप्न साकार करण्यासाठी कितीही अपयश आले, तरी हार न मानता चिकाटीने प्रयत्न केले, तर यश नक्कीच मिळते, याचे जिवंत उदाहरण कावपिंप्रीच्या हर्शल रवींद्र पाटील या तरुणांना दिले आहे. (Success after 11 failures story of harshal patil jalgaon news)
हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’
शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला हर्शल पाटील पदवीधर आहे. परिस्थितीची जाणीव आणि मेहनत हर्शलच्या अंगी लहान वयापासूनच होते. लष्करात जाऊन देशाची सेवा करावी, ही जिद्द मनात धरून त्याने तयारी सुरू केली.
गावात पोलिस आणि अधिकाऱ्यांचा फार मोठा वर्ग आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन रात्रंदिवस तो मेहनत करू लागला. मात्र, २०१३ पासून तर आजपर्यंत अकरा वेळा कोणत्या ना कोणत्या कारणाने अपयश आले.
शेवटी हर्शल भारतीय रेल्वेमध्ये पोलिस शिपाईपदासाठी यशस्वी झाला. त्यामुळे हर्शलचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.