Success Story : जिद्द, मेहनतीच्या बळावर मजुरांची मुले पोलिस खात्यात!

nikhi sapkale and narendra pawar
nikhi sapkale and narendra pawaresakal
Updated on

Jalgaon News : मजुरी करणाऱ्या आई- वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तालुक्यातील दोधवद व खेडी खुर्द प्रगणे जळोद येथील दोघा तरुणांनी मेहनतीच्या जोरावर पोलिस खात्यात नोकरी मिळवण्याचे यश प्राप्त केले आहे. (success story Both youths of laborers succeeded in getting jobs in police department jalgaon news)

दोधवद येथील बंटी उर्फ निखिल विलास सपकाळे याची आई कौटुंबिक वादामुळे माहेरी त्याच्या मामाकडे घर वजा झोपडीत राहते.

अत्यंत हालाखीची परिस्थिती असल्याने तसेच अभ्यास आणि व्यायाम करायला सुविधा नाही पण अशाही परिस्थितीत आईला बापाच्या दुःखातून सुख देण्यासाठी, मजुरीच्या कचाट्यातून बाहेर काढण्यासाठी त्याने अभ्यास आणि मेहनत करून पोलिस म्हणून नोकरी मिळवली. त्याचे श्रेय त्याने आई स्वाती, मावशी वंदना सोनवणे व मामांना दिले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

nikhi sapkale and narendra pawar
HSC Success Story : उसनवारीच्या पुस्तकातून यशाला गवसणी!

तर खेडी खुर्द येथील नरेंद्र याचे वडील प्रकाश सुखदेव पाटील बांधकामाची वेठबिगारी करतात आणि आई मनीषा प्रकाश पाटील शेतीचे काम करते. आई वडिलांच्या कष्टाला यश द्यावे आणि त्यांना त्यातून मुक्त करण्यासाठी नरेंद्रने गेल्या तीन वर्षापासूनच मैदानावर सराव सुरू केला होता.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच सोबतच अभ्यास सुरू केल्याने पहिल्याच प्रयत्नात पोलिस भरतीत यश मिळवले आहे. आई-वडिलांच्या सुखासाठी मेहनत घेऊन यश मिळवणाऱ्या दोघा तरुणांवर तालुक्यात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

nikhi sapkale and narendra pawar
Success Story : दृढ निश्चय, आत्मविश्वासाच्या जोरावर अंजली बनली पोलिस शिपाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()