Success Story : चाळीसगावच्या भूमिपुत्राने वैज्ञानिक क्षेत्रात रोवला झेंडा! बनला आंतरराष्ट्रीय संशोधक

Parth Pawar
Parth Pawaresakal
Updated on

मेहुणबारे (जि. जळगाव) : चाळीसगाव येथील युवक पार्थ पवार याने स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर शिखर गाठत आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधन केंद्रात संशोधक पदापर्यंतची भरारी घेतली आहे. त्याचे प्राथमिक माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण चाळीसगाव येथे तर पुढील शिक्षण येथील उदयपूर (राजस्थान) येथे झाले.

त्यानंतर गुजरात राज्यात नोकरीही केली आता त्यांची वाराणसी येथील दक्षिण एशिया केंद्रात संशोधक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या भरारीमुळे अनेक युवकांना देखील जिद्द आणि स्वतःच्या मेहनतीवर यश मिळवता येते, असे मत पार्थ पवार यांनी व्यक्त केले. (Success Story parth pawar of Chalisgaon Become an international researcher jalgaon news)

चाळीसगाव येथील रहिवासी तथा निवृत्त शासकीय लेखापरीक्षक राजेंद्रसिंग भावसिंग पवार व भारती राजेंद्रसिंग पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची आंतरराष्ट्रीय भारत संशोधन केंद्र, वाराणसी येथे वैज्ञानिक म्हणून निवड झाली आहे.

दक्षिण आशिया प्रादेशिक केंद्र, वाराणसी या ठिकाणी नियुक्ती झाली आहे. पार्थ पवार यांनी एम टेक. महाराणा प्रताप युनिव्हर्सिटी, उदयपूर येथून पूर्ण केले आहे. सध्या ते नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन, गांधीनगर गुजराथ येथे कार्यरत आहेत.

जगात भाताचे पीक घेताना त्याचे उत्पन्न वाढावे, यासाठी यांत्रिकीकरणाची आवश्यकता असते. या यांत्रिकीकरणाचे संशोधन करून नवनवीन मशिन आणणे या आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेत होणार आहे.

या संस्थेचे जगात सहा संशोधन केंद्रे असून, त्यात भारतातील त्याचे मुख्यालय वाराणसी येथे एक केंद्र आहे. त्यात केद्रांतर्गत भारत, बांगलादेश, नेपाळ व श्रीलंका या देशांचा समावेश आहे. फॉम मशिनरीचे यांत्रिकरणाचे संशोधन केले जाणार आहे.

अशा अत्यंत महत्त्वाच्या संशोधन संस्थेत चाळीसगावच्या या तरुणाची वैज्ञानिक म्हणून नियुक्ती झाल्याने सर्व थरातून कौतुक होत आहे.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

Parth Pawar
Success Story : देवळ्याच्या लेकीची उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी; राज्यात OBC संवर्गात मुलींमध्ये आली दुसरी

वैज्ञानिक क्षेत्रात रोवला झेंडा

पार्थ पवार यांचे वडील राजेंद्रसिंग पवार हे शासकीय लेखापरीक्षक म्हणून कार्यरत होते. दोन वर्षापूर्वी ते निवृत्त झाले. सध्या ते निवृत्तीचे जीवन जगत आहेत. राजेंद्रसिंग पवार यांनी आपल्या दोन्ही मुलांना उच्चशिक्षित केले.

या आपल्या कष्टाच्या आणि बुद्धीच्या जोरावर पार्थ पवार यांनी प्रगतीचे अनेक शिखरे पादाक्रांत करीत आंतरराष्ट्रीय भात संशोधन केद्र वाराणशी येथे वैज्ञानिक म्हणून निवड झाली. चाळीसगाव तालुक्यात पर्यायाने खानदेशचा झेंडा यांनी वैज्ञानिक क्षेत्रात फडकावला आहे. या सुपुत्राने गगन भरारी घेत तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे.

"जिद्द, चिकाटी आणि स्वतःवर विश्वास असल्याने मी सतत अभ्यास करत गेलो.अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांचा स्वतःवर विश्वास असेल आणि मेहनत करण्याची जिद्द असेल आणि संयम ठेवला तर यश नक्कीच मिळते. प्रत्येक संधीचे सोन करणे हे आपल्या हातात असते. आत्मविश्वास, जिद्द, मेहनत, संयम ही यशाची गुरुकिल्ली आहे." - पार्थ पवार, चाळीसगाव

Parth Pawar
Success Story : केरसाणेतील पुनम अहिरेनी उपजिल्हाधिकारी पदाला घातली गवसणी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.