Jalgaon News : शहर महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी महापालिकेच्या सतरा मजली इमारतीच्या प्रत्येक विभागात शुक्रवारी (ता. १६) जाऊन कामकाजाची पाहणी केली, तसेच रेकार्ड विभागात जाऊनही तपासणी केली.
गणवेश नसलेल्या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली, तर कार्यालयात हजर नसलेल्या कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली.
महापालिकेतील कर्मचारी वेळेवर येत नाहीत, काही जण आले, तर कार्यालयात हजर नसतात, अशा तक्रारी वेळोवेळी प्राप्त झाल्याने महापालिका आयुक्त विद्या गायकवाड यांनी महापालिका प्रशासकीय इमारतीमधील सर्व विभागांत अचानक जाऊन तपासणी केली.(sudden inspection by Commissioner in Municipal Corporation Notice to Absent Employees Action against those not in uniform Jalgaon News)
गणेवश नसलेल्या सात कर्मचाऱ्यांवर दडात्मक कारवाई करण्यात आली. पंचिग करून कामावर हजर नसलेल्या दोन कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली. यात आरोग्य विभाग व वाहन व्यवस्था विभागामधील प्रत्येकी एक कर्मचाऱ्यावर ही कारवाई करण्यात आली.
दप्तर वर्गीकरणाची पाहणी
महापालिकेतील दप्तर ‘अ’, ‘ब’, ‘क’ व ‘ड’ नुसार वर्गीकरण करण्याच्या सूचना पूर्वी दिल्या होत्या. त्यानुसार विभागात रेकॉर्ड वर्गीकरण केले जात आहे, की नाही याची पाहणी आयुक्तांनी केली. यात यात किरकोळ वसुली विभाग व स्टोअर विभागाचे रेकॉर्ड व्यवस्थित वर्गीकरण केलेले आढळून आले.
कागदपत्रे संगणकीकृत करणार
महापालिकेतील २००० मध्ये पुणे येथील गर्गे यांच्या खासगी एजन्सीमार्फत महापालिकेच्या प्रत्येक विभागातील रेकॉर्ड वर्गीकरण करून घेण्यात आले होते. रेकॉर्ड विभागात सर्व दप्तर व्यवस्थित लावण्यात आले होते. आता रेकॉर्ड ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’नुसार वर्गीकरण करून त्याचे संगणीकृत केले जाणार आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.