Jalgaon Crime News : खुनाच्या गुन्ह्यात संशयित म्हणून जिल्हा कारागृहात दोन वर्षांपासून बंदी असलेल्या अमोल ऊर्फ कार्तिक नाना सोनवणे याने बॅरेकमध्ये रुमालाच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. (Suicide attempt of prisoner in district jail jalgaon crime news)
ही घटना मंगळवारी (ता. २९) मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आली. वेळीच इतर बंदिवानांनी त्याचे पाय धरून ठेवत त्याला खाली उतरवून जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील संशयित अमोल सोनवणे हा २६ ऑगस्ट २०२१ पासून जिल्हा कारागृहातील कोविड बॅरेकमध्ये बंदी म्हणून आहे. सोमवारी (ता. २८) कारागृहातील शिपाई विकास महाजन व त्यांचे सहकारी सुरेश बडगुजर, संदीप थोरात, नितीन सपकाळे यांची रात्रपाळीची ड्यूटी होती.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
सायंकाळी सहाला ते ड्यूटीसाठी कारागृहात हजर झाले. २९ रोजी दुपारी एकच्या सुमारास सुरेश बडगुजर, नितीन सपकाळे यांच्याकडून ड्यूटीचा चार्ज देवाण-घेवाण करीत असताना अचानक कोविड बॅरेकमधील बंदिवानांची आरडाओरड चालू झाली. त्यामुळे शिपाई महाजन, सुरेश बडगुजर व नितीन सपकाळे, संदीप थोरात यांच्यासह त्यांनी धाव घेतली.
त्या वेळी बॅरेकमधील बंदी अमोल ऊर्फ कार्तिक सोनवणे पांढऱ्या रंगाच्या बागायतदार रुमालाने बॅरेकमधील कपाटावर चढून आडव्या खांबाला गळफास घेताना दिसला.
कारागृहातील पोलिसांनी त्या बॅरेकमध्ये इतर बंदिवानांना सोनवणे याचे पाय पकडून ठेवण्यास सांगितले. एकाने त्याच्या गळ्यातील रुमाल सोडवून त्याला खाली उतरवीत त्याचा जीव वाचविला. पोलिस उपनिरीक्षक गणेश देशमुख तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.