जळगाव : शहरातील समतानगरातील तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. सुधीर साळुंखे (वय ३३, रा. समतानगर) असे मयत तरुणाचे नाव आहे.
रामानंदनगर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर साळुंखे हा तरुण आई- वडील, पत्नी व भाऊसोबत समतानगरात वास्तव्याला आहे. तो सुरत येथे वास्तव्याला होता परंतु कोरोनामुळे कामकाज बंद झाल्यानंतर पत्नीसह जळगावला होता.
शनिवारी (ता. ११) रात्री कुटुंबीयांसह जेवण करून सर्वजण झोपले होते. मध्यरात्री सर्वजण झोपलेले असताना सुधीर साळुंखे यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. सुधीर यांनी आत्महत्त्या केल्याचे दिसताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.
याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस नाईक अतुल चौधरी करीत आहे. मयत सुधीरच्या पश्चात आई मालूबाई, वडील नाना साळुंखे, भाऊ मुकेश, पत्नी मोनाली, मुलगी पूर्वा आणि दीड वर्षाचा मुलगा असा परिवार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.