Jalgaon News : ‘त्या’ हाणामारीचा व्हिडिओ पोचला एसपींकडे... शनिपेठ पोलिसांना घेतले फैलावर

A young man arguing with a bike rider blocking the road.
A young man arguing with a bike rider blocking the road. esakal
Updated on

Jalgaon News : शहरातील चौगुले प्लॉट भागात रविवारी (ता. १६) रात्री साडेअकराच्या सुमारास एका दुचाकीधारकाचा रस्ता अडवून डोक्यात फरशी टाकून जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. दुचाकीवर मोठमोठे दगड टाकून नुकसान केले आहे.

हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झाला. त्याचा व्हिडिओ व्हायरल होऊन पोलिस अधीक्षकांपर्यंत पोचला. (Superintendent of Police M Rajkumar interrogated suspects and filed mutual cases jalgaon news)

गुन्हे शाखेच्या पथकाने संशयितांना ताब्यात घेतल्यावर शनिपेठ पोलिसांनी कारवाई का केली नाही, म्हणून फैलावर घेत पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी स्वतः संशयितांची चौकशी करून परस्पर गुन्हे दाखल केले.

चौघुले प्लॉट कॉर्नरनजीक रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास सचिन संजय मिस्तरी (रा. कांचननगर) व त्याचा मित्र संतोष अनिल गवळी दुचाकी (एमएच १९, एआर ८७८६)वरून जात होते. त्यांनी अश्लील शेरेबाजी केली, म्हणून पांझरापोळ चौकात महिलांनी फोन करून त्या दोघांना बोलावून घेतले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

A young man arguing with a bike rider blocking the road.
Jalgaon Crime News : झोपलेल्या रिक्षाचालकाचे पैसे-मोबाईल हिसकवला; आर्जव करूनही मारहाण

मात्र, सुमित संजय सोनवणे व त्याच्या मित्राने दोघा दुचाकीस्वारांना शनिमंदिराजवळ बोलावले. घाबरून ममुराबाद रस्त्याने जात असताना, लेंडीनाला पुलाअलीकडे दुचाकी अडवून सुमीत सोनवणे, मयूर कोळी, राहुल कोळी, गौरव जोहरे, नितीन निकम (सर्व रा. जुने जळगाव) यांच्यासह इतरांनी लाठ्याकाठ्या दगडांनी सचिन मिस्तरी व संतोषला मारहाण करून जखमी केले व दगडाने दुचाकी व कारचे नुकसान केले. संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करून शनिपेठ पोलिसांच्या स्वाधीन केले.

A young man arguing with a bike rider blocking the road.
Jalgaon Crime News : जळगावात दिवसा गोळीबाराचा थरार! गुटख्याच्या पुडीवरून ठिणगी...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.