जळगाव : हल्ला चढविणारे आमदार चंद्रकांत पाटलांचे समर्थक; रोहिणी खडसे

जिल्हाभरात उमटले पडसाद; अटकेसाठी दिलाअल्टिमेटम
जळगाव : हल्ला चढविणारे आमदार चंद्रकांत पाटलांचे समर्थक; रोहिणी खडसे
Updated on

मुक्ताईनगर : सोमवारी रात्री ज्या हल्लेखोरांनी केलेला सशस्त्र हल्ला(attack) हा केवळ धमकावण्यासाठी नव्हे तर जिवे मारण्याच्याच उद्देशाने केल्याचा दावा करत ॲड. रोहिणी खडसे- खेवलकर(adv. rohini khadse) यांनी हल्लेखोर शिवसेनेचे पदाधिकारी व आमदार चंद्रकांत पाटलांचे(shivsena mla chndrkant patil) समर्थक असल्याचा आरोप केला. जिल्हा बँकेच्या(jalgaon district bank) माजी अध्यक्षा रोहिणी खडसेंवर सोमवारी झालेल्या हल्ल्याचे मंगळवारी (ता.२८) दिवसभर जिल्ह्यात पडसाद उमटले. मुक्ताईनगरात(muktainagar) राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे(ncp) ठिय्या आंदोलन करण्यात आले. जळगावात(jalgaon) महानगर राष्ट्रवादी काँग्रेसने पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले.

जळगाव : हल्ला चढविणारे आमदार चंद्रकांत पाटलांचे समर्थक; रोहिणी खडसे
रोहिणी खडसे यांनी सांगितला आपल्यावरील हल्ल्याचा घटनाक्रम;पाहा व्हिडिओ

हल्लेखोर शिवसेनेचेच

रोहिणी खडसेंनी हल्ल्याची माहिती देताना हल्लेखोरांची नावेही आज उघड केली. यात सेनेचा विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील, तालुकाप्रमुख छोटू भाई व चांगदेवचे माजी ग्रामपंचायत सदस्य पंकज कोळी यांची नावे घेतलीत. बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या दिवशीही सेनेच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप खडसे यांनी केला.

जळगाव : हल्ला चढविणारे आमदार चंद्रकांत पाटलांचे समर्थक; रोहिणी खडसे
धोनीच्या निवृत्तीवेळी ड्रेसिंग रुममध्ये काय झाले; शास्त्रींनी सांगितला घटनाक्रम

पाटील कसला शिवसैनिक? मुख्यमंत्र्यांशी बोलणार!

दोन दिवसांपूर्वी मी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांचे संभाषण असलेल्या क्लिप जारी केल्या. ते आणि हल्ला करणारे हे एकच असून गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, असे सांगत माजी मंत्री खडसे म्हणाले, ॲड. रवींद्र पाटील यांनी त्याग केला त्या राष्ट्रवादीच्या जागेचा वापर करून चंद्रकांत पाटील आमदार झाले. आणि काय स्वत:ला शिवसैनिक म्हणवून घेतो? ज्यांनी निवडून आणले, त्याच कार्यकर्त्यांच्या जिवावर त्याचे लोक उठलेत. मी याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे असेही खडसेंनी सांगितले.

जळगाव : हल्ला चढविणारे आमदार चंद्रकांत पाटलांचे समर्थक; रोहिणी खडसे
राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिनी खडसेंच्या गाडीवर हल्ला,पाहा व्हिडिओ

सेना पदाधिकाऱ्यांसह सात जणांविरुद्ध गुन्हा

ॲड. खडसे यांच्या वाहनावर झालेल्या प्राणघातक हल्ल्या प्रकरणात तीन शिवसेना पदाधिकाऱ्यांसह चार अनोळखी अशा सात जणांविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रोहिणी खडसे यांनी पोलिसात फिर्याद दिली. त्यात रात्री चांगदेव येथील हळदीच्या कार्यक्रमातून परतत असताना रात्री नऊच्या सुमारास मानेगाव फाट्यापासून अर्ध्या किमी अंतरावर त्यांच्या वाहनासमोर तीन मोटरसायकल आडव्या झाल्या आणि रस्ता अडविला. या वेळी गाडीच्या प्रकाशात चेहरे दिसून आले. त्यात सुनील पाटील याने वाहनांच्या डाव्या बाजूने येऊन पिस्तूल रोखले. चांगदेव ग्रामपंचायत सदस्य पंकज कोळी याच्या हातात तलवार तर छोटू भोई याच्या हातात लोखंडी रॉड होता. त्यांनी वाहनाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला आतून लॉक असल्याने दरवाजा उघडला नाही. यातून त्यांनी वाहनावर प्राणघातक हल्ला चढविला. उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()