Jalgaon News : जळगाव शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्याचा वाद आता थेट विधिमंडळात पोहचला आहे. भाजप आमदार सुरेश भोळे यांनी सत्ताधारी शिवसेना ठाकरे गट अडवणूक करीत असल्याचा आरोप केला आहे.
विधिमंडळात जळगाव शहरातील रस्ते कामांचा प्रश्न मांडताना आमदार सुरेश भोळे म्हणाले की, जळगावातील रस्ते दुरुस्तीसाठी राज्य शासनाने आतापर्यंत तब्बल अडीचशे कोटी रुपयांचा निधी दिला आहे. (suresh bhole raise question of Obstruction by ruling group in road work in legislature Jalgaon News)
त्याचे कामही सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करण्यात येत आहे, मात्र महापालिका कामे करण्यास ना हरकत प्रमाणपत्र देण्यास अडथळा निर्माण करीत आहे. त्यामुळे निधी असूनही कामे होत नाही, त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी मध्यस्थी करून रस्ते कामास ना हरकत प्रमाणपत्र देण्यास महापालिकेला आदेश द्यावेत अशी मागणीही त्यांनी केली.
संकुलातील गाळ्यांचा प्रश्न
शहरातील महापालिकेच्या २८ व्यापारी संकुलातील गाळे धारकांचा वार्षिक भाडे तत्वाचा प्रस्न प्रलंबित आहे, त्याबाबतही त्यांनी विधीमंडळात प्रश्न उपस्थित केला. त्यांनी सांगितले, संकुलातील गाळे भाड्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यावर मार्ग काढण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष देवून काढून गाळेधारकांना कमीत कमी वार्षिक भाडे आकारणी शासनाने करून द्यावी अशी मागणीही आमदार भोळे यांनी विधिमंडळात केली आहे.
"शहरातील विकास कामासाठी शासनाच्या माध्यमातून आतापर्यंत तीनशे कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. रस्त्याच्या कामासाठी महापालिकेने ना-हरकत द्यावयाची आहे. मात्र ते सुध्दा दिले जात नाही. वास्तविक मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारी महापालिकेची असतानाही विकास कामासाठी अडथळा निर्माण केला जात आहे. महापालिकेने तातडीने ना-हरकत प्रमाण पत्र द्यावे."- सुरेश भोळे आमदार, जळगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.