जळगाव : राज्याचे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना न्यूमोनियाचा त्रास होत असल्याने त्यांना तातडीने मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती बरी असल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले.
माजी मंत्री सुरेशदादा जैन बुधवारी (ता. १४) तब्बल पाच वर्षांनंतर मुंबई येथून जळगावला आले होते. त्यांचे जळगावात जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दररोज मोठ्या संख्येने लोक येत आहेत. (Sureshdada Jain admitted to Breach Candy Hospital Jalgaon News)
काही सार्वजनिक कार्यक्रमातही ते सहभाग घेत होते. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना अचानक ताप येत होता. त्यांन न्यूमोनिया झाल्याचे निदान झाले. गुरुवार (ता. २२) रात्री त्यांना त्रास होऊ लागला. त्यावेळी डॉ. राहुल महाजन यांच्याकडे उपचारासाठी दाखल केले होते.
मुंबई येथील डॉक्टरांचे त्यांच्यावर उपचार सुरू असल्याने त्यांना उपचारासाठी मुंबईत दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. शुक्रवारी (ता. २३) सायंकाळी पाचला एअर ॲम्बुलन्सने जळगाव विमानतळावरून मुंबईला नेण्यात आले. ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती बरी असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.