Jalgaon Crime News : पोलिस ठाण्यातून संशयित निसटले; शस्त्र, रॉडचा वापर, तरी हाणामारीच दाखल

Crime News
Crime Newsesakal
Updated on

जळगाव : शहरातील दंगलग्रस्त कॉलनीत गुरुवारी (ता. ५) दोन गटांत तुंबळ हाणामारी होऊन शस्त्रांचा सर्रास वापर करून एकाला गंभीर जखमी करण्यात आले. गुन्हा घडल्यानंतर पोलिस आले, दोन्ही गटांची परस्पर विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली.

तक्रार दाखल करण्यासाठी आलेले तक्रारदारच संशयित असल्याने तक्रार देऊन त्यांनी अलगद पळ काढला. फरारी संशयितांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Suspect escapes from police station Jalgaon Crime News)

Crime News
Nashik News : कोपरगाव ते कान्हेगाव दरम्यानच्या ब्लॉकमुळे रेल्वे गाड्या रद्द; जाणुन घ्या गाड्यांची स्थिती

जिल्‍हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दंगलग्रस्त कॉलनीत वाहन घरासमोर का लावले, या करणावरून वादला सुरवात होऊन लोखंडी रॉड, लाठ्या काठ्यांसह तलवार-चॉपरसह हाणामारी झाली.

या हाणामारीत रईस हमीद खाटीक ऊर्फ रईस लाला याच्या डोक्यावर, हातावर, पाठीवर लोखंडी रॉडसह चाकूने हल्ला झाला. जखमी तरुणाला जिल्‍हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे पोलिसांनी जबाब घेतल्यावर आदीलखान, शेख अकबर, साजीद खान या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

Crime News
Nashik News : 12 वर्षीय बालकाच्या अपहरण प्रकरणातील चौथा संशयित गजाआड

दुसऱ्या गटातील आदीलखान जाफर खान (वय ३५) याच्या तक्रारीवरून मुजाहिद, जाकीर, आसीफ आणि रईस या चौघांविरुद्ध जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जवळपास दहापेक्षा अधिक संशयित गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात हजर होते. एका गटाची तक्रार दाखल झाली, तेव्हा दुसऱ्या गटाचे संशयित आले.

परस्पर विरुद्ध गुन्हे दाखल होत असताना, दोन्ही गटांतील संशयित पोलिस ठाण्यात हजर होते. मात्र, पोलिसांना ओळखू न आल्याने संशयित अलगद निसटले. दुसरीकडे जखमी रईस खाटीक याच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली असून, त्याला औरंगाबादला हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

Crime News
SAKAL Impact News : उद्यान स्वच्छता मोहीमेस सुरवात; कालिका उद्यानातील खेळण्यांचीही लवकरच होणार दुरुस्ती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.