Jalgaon News: निमखेडी-बांभोरीदरम्यान पुलाच्या कामाच्या प्रक्रियेस स्थगिती; निविदाप्रक्रिया थांबविण्याच्या सूचना

Suspension of bridge work process between Nimkhedi Bambhori jalgaon news
Suspension of bridge work process between Nimkhedi Bambhori jalgaon news
Updated on

Jalgaon News : गिरणा नदीवर निमखेडी-बांभोरीदरम्यान जुन्या महामार्गावरील नियोजित बंधारा वजा पुलाच्या कामात केवळ पुलाचे काम रेटून नेण्याचा प्रकार समोर आल्यानंतर त्यासंबंधी ‘सकाळ’ने पाठपुरावा केल्यामुळे पुलाच्या निविदा प्रक्रियेस स्थगिती देण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली आहे. जनभावनेच्या दबावाने आता याठिकाणी बंधारा वजा पुलाचेच काम होणार असून, त्यासाठी पाठपुरावा करावा लागणार आहे.

गिरणा नदीवर जुन्या महामार्गावर निमखेडी व बांभोरी जोडणारा जुना पूल होता. त्याच ठिकाणी बंधारा वजा पूल करण्यासंबंधी जुलै २०२२ मध्ये शासन निर्णय होऊन ४० कोटींच्या निधीला मान्यता देण्यात आली होती. (Suspension of bridge work process between Nimkhedi Bambhori jalgaon news)

मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने बंधारा वगळून पूल बांधण्यासाठी निविदा मागविल्या, त्या स्वीकृत करून कार्यादेश देण्याची प्रक्रियाही सुरू केली. मात्र, त्याला सर्व स्तरातून विरोध होत असून, ‘सकाळ’ने याबाबत वृत्त ठळकपणे प्रसिद्ध केल्यानंतर त्याचे पडसाद उमटू लागले.

कृती समितीचे प्रयत्न

पुलासोबतच बंधाऱ्याचेही काम व्हावे म्हणून त्यासाठी पूल वजा बंधारा निर्मिती कृती समिती स्थापन झाली आहे. समिती सदस्यांनी २० नोव्हेंबरला बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांचे प्रतिनिधी उपअभियंता गिरीश सूर्यवंशी व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन या कामाबाबत निवेदन दिले. पूल वजा बंधाऱ्याचे बांधकाम होण्यासाठी प्रशासकीय मंजुरी असताना केवळ पुलाच्या कामाचा घाट घातला जात असल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले.

बंधारा रद्द केला म्हणून त्याचा पुन्हा समावेश करण्यात यावा व जळगाव शहर व ग्रामीण विभागाची पाण्याची टंचाई दूर करावी, या मागणीसाठी कृती समितीने प्रस्ताव दिला होता. ‘सकाळ’ने या संदर्भात गेल्या महिन्यात वृत्तमालिका प्रसिद्ध केली.

Suspension of bridge work process between Nimkhedi Bambhori jalgaon news
Jalgaon News: जिल्ह्याचा 11 हजार कोटींचा वित्त पुरवठा आराखडा; नाबार्ड’चा उपक्रम

पालकमंत्र्यांकडून दखल

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनाही कृती समितीने निवेदन दिले. ‘सकाळ’नेही त्यासंबंधी पाठपुरावा केला. तीव्र झालेली जनभावना व पुलासह बंधाऱ्याच्या कामाची आवश्‍यकता, या भागात पाण्याचा स्रोत निर्माण करण्यासाठी असलेली बंधाऱ्याची गरज या सर्व बाबी लक्षात घेऊन पालकमंत्र्यांनी सध्या सुरू असलेल्या पुलाच्या कामाची प्रक्रिया स्थगित करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार आता यासंबंधीची निविदाप्रक्रिया थांबविण्यात आली असून, नव्याने अंदाजपत्रक तयार करून बंधाऱ्यासह पुलाच्या कामाचा प्रस्ताव तयार करून, त्यास तांत्रिक व प्रशासकीय मान्यता घेतली जाईल. अंदाजपत्रक तयार करून त्यास मंजुरीनंतर निविदाप्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

Suspension of bridge work process between Nimkhedi Bambhori jalgaon news
Jalgaon Kalbhairavanath Yatrotsav: चांदसणीला कालभैरवनाथांचा उद्या यात्रोत्सव; लाखो भाविक दर्शन घेणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()