Jalgaon News : ‘त्या’ महिला पोलिसाची दादागिरी नडली; गुन्हा दाखलनंतर पोलीस अधीक्षकांकडून निलंबन

Suspension of women policemen by Superintendent of Police jalgaon news
Suspension of women policemen by Superintendent of Police jalgaon newsesakal
Updated on

Jalgaon News : शहरातील सिंधी कॉलनी परिसरात पंचमुखी हनुमान मंदिर जवळील रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी आलेल्या डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांवर रविवारी (ता.२९) प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. (Suspension of women policemen by Superintendent of Police jalgaon news)

दवाखान्याबाहेर कार उभी केल्यावरून वाद होऊन नारळपाणी विक्रेता अर्जुन राठोड, महिला पोलीस शिला राठोड आणि इतर एक अशा तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. सोमवारी (ता. ३०) सकाळी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी महिला पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

शहरातील प्रतापनगर रिंगरोड येथे डॉ. निरज चौधरी (वय ३३) यांचे रुग्णालय आहे. ते पंचमुखी हनुमान मंदिर परिसरातील नीलकमल रुग्णालयात रुग्णाच्या शस्त्रक्रियेसाठी रविवारी (ता.२९) सहकारी अजय सेनानी, मंगेश दांगोडे यांच्यासह आले होते. तेथे डॉ.चौधरी यांनी कार (एमएच १९ सीएफ ५६२८) रुग्णालयाबाहेर पार्किंगमध्ये लावून आत गेले. डॉक्टर ऑपरेशन थिएटरमध्ये असतानाच त्यांच्या कारची तोडफोड सुरू झाली.

Suspension of women policemen by Superintendent of Police jalgaon news
Jalgaon News : दिवाळीनंतर निघणार शासकीय कापूस खरेदीचा मुहूर्त

रुग्णालयातील वॉर्डबॉयने सांगितल्यावर डॉक्टर तसे बाहेर आले. त्यांच्याशी हल्लेखोरांनी गाडी लावण्याच्या कारणावरून वाद घातला. नारळपाणी विक्रेता अर्जुन राठोड, सोनू चव्हाण या दोघांनी डॉक्टरांसह त्यांच्या सहकाऱ्यांना मारहाण करून कोयत्याने हल्ला चढवला. घटनेवेळेस महिला पोलीस कर्मचारी राठोड इथे हजर होत्या. दोघांच्या बाजूने त्याही डॉक्टरांच्या मारहाणीत सामील असल्याने व त्यांनी ‘मी पोलीस आहे', असे धमकावल्याचे तक्रारीत स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.

शहर पोलीस ठाण्यात कार्यरत शिला राठोड असे निलंबित करण्यात आलेल्या महिला पोलिसांचे नाव आहे. नारळपाणी विक्रेता त्यांचा नातेवाईक असल्याचे सांगण्यात आले. घडल्या प्रकाराबाबत स्वतः माहिती घेत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी निलंबनाची कारवाई केली. बेशिस्त खपवून घेणार नाही, असा संदेश पोलीस अधीक्षकांनी या कारवाईतून दिला आहे.

Suspension of women policemen by Superintendent of Police jalgaon news
Jalgaon News : महावीर पतसंस्थेच्या संचालकांवर जिल्हा बँकेची कर्जवसुलीची कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.