Jalgaon News : नित्यानंदनगरातील तरुणाचा संशयास्पद मृत्यू

dead
deadesakal
Updated on

Jalgaon News : संभाजीनगर-नित्यानंदनगर परिसरातील तरुणाचा झोपेतच मृत्यू झाल्याची घटना घडली. बुधवारी (ता. १३) घरातून बाहेर पडला.

रात्री नऊला परतल्यानंतर झोपला. मात्र, सकाळी तो उठलाच नाही. (Suspicious death of youth in Nityanand Nagar jalgaon news)

रुग्णालयात नेण्यात आल्यावर डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. मृताच्या सर्वांगावर मारहाणीच्या खुणा असून, त्याचा घातपात झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला.

संभाजीनगर नित्यानंदनगर येथे पवन सुधाकर दुसाने (वय ३२) आई-वडील,भाऊ, पत्नी व दोन मुलींसह राहतो. मिळेल ते काम करून तो कुटुंबास हातभार लावत होता. घटनेच्या दिवशी बुधवारी (ता. १३) सायंकाळ तो घराबाहेर पडला.

dead
Jalgaon Crime News : पाचोऱ्याचा गौरव पाटील ‘एटीएस’च्या कोठडीत

रात्री घरी आल्यानंतर त्याच्या खोलीत झोपला. सकाळी मात्र तो उठलाच नाही. कुटुंबीयांनी उठवण्याचा प्रयत्न केला. तो उठत नाही म्हणून रुग्णालयात नेले असता मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता अच्छा यांनी पवन दुसाने यास मृत घोषित केले.

पवन रात्री घरी आल्यावर झोपला. झोपेतच त्याचा मृत्यू झाला. हा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत कुटुंबाने शंका घेऊन अंग तपासले असता अंगावर मारहाणीच्या खुणा आढळल्याने कुटुंबने घातपाताच संशय व्यक्त केला आहे. रामानंदनगर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.

dead
Jalgaon News: रस्ते-पुलांच्या बांधणीसाठी 300 कोटींचा निधी; जामनेर तालुक्यासह जिल्ह्यात होणार विकासकामे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.