Jalgaon Crime News : ‘ATM’मधून गैरव्यवहार; संशयितांकडून मुद्देमाल जप्त

बॅंकांच्या ‘एटीएम’मधून पैशांचा गैरव्यवहार करणाऱ्या येथील तिघा संशयितांकडून पोलिसांनी रोकडसह मुद्देमाल जप्त केला आहे.
Police inspector Sandeep Patil and his colleagues with the suspects who committed fraud from the ATM.
Police inspector Sandeep Patil and his colleagues with the suspects who committed fraud from the ATM.esakal
Updated on

Jalgaon Crime News : बॅंकांच्या ‘एटीएम’मधून पैशांचा गैरव्यवहार करणाऱ्या येथील तिघा संशयितांकडून पोलिसांनी रोकडसह मुद्देमाल जप्त केला आहे. यातील काही रक्कम व मुद्देमाल अजून ताब्यात घेणे बाकी असून, ज्यांनी या संशयितांकडून पैसे घेतलेले आहेत, अशांना पोलिसात जमा करण्याबाबत नोटीस देण्यात आल्या आहेत.

त्यांनी त्यांच्याकडील रक्कम जमा केली नाही तर त्यांनाही या गुन्ह्यात आरोपी केले जाईल, असे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.(Suspicious items seized from ATM fraud suspects jalgaon crime news)

याबाबत माहिती अशी, येथील प्रवीण देविदास गुरव (वय ३८), दीपक भिकन पवार (वय ३४, दोन्ही रा. पाटणदेवी रोड, आदित्यनगर) हे दोघे सिक्युर हॅल्यू इंडिया लिमिटेड या खासगी कंपनीमार्फत कस्टोडियन म्हणून बँकामधून रोख रक्कम काढून ‘एटीएम’मध्ये भरण्याचे काम करतात. या दोघांनी मे ते डिसेंबर २०२३ दरम्यान वेळोवेळी थोडी थोडी रक्कम मिळून एकूण ६४ लाख ८२ हजार २०० रुपये परस्पर काढून ते आपापसांत वाटून घेतले.

हा गैरव्यवहार ऑडिटर चंद्रशेखर एकनाथ गुरव (वय ४३, रा. गुजराल पेट्रोलपंपाजवळ, निवृत्तीनगर जळगाव) यांना लक्षात आला. मात्र, त्यांनी याबाबत कंपनीला न कळवता यातील संशयित प्रवीण गुरव १४ लाख रुपये घेतले. त्यामुळे त्याने दोन्ही संशयितांना मदत करून कंपनीला खोटा ऑडिट अहवाल तयार करून पाठविला.

हा प्रकार लक्षात येताच १८ डिसेंबरला फिर्यादी गोरक्षनाथ पोपट डोंगरे (वय ३८, रा. पंचवटी, नाशिक) यांनी पोलिसात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांना तिघा संशयितांना अटक केली. या गुन्ह्याचा सखोल तपास करून गुन्ह्यातील गैरव्यवहार केलेली रक्कम हस्तगत करण्यासंदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे

व सहाय्यक पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांनी केलेल्या सूचनेनुसार, पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. ज्यात उपनिरीक्षक सुहास आव्हाड, राहुल सोनवणे, योगेश बेलदार, महेंद्र पाटील, दीपक पाटील, उज्ज्वलकुमार म्हस्के, ज्ञानेश्वर पाटोळे, विनोद खैरनार.

Police inspector Sandeep Patil and his colleagues with the suspects who committed fraud from the ATM.
Jalgaon Crime News: हनुमंतखेड्याच्या तरुणाचा यात्रेत खून; तमासगिरांसह मित्रांची चौकशी

आशुतोष सोनवणे, अमोल भोसले व महिला कर्मचारी सबा शेख यांची नेमणूक केली होती. तपासादरम्यान पथकाने तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख रक्कम, सोन्याचे दागिने व गैरव्यवहाराच्या रकमेतून घेतलेली कार असा एकूण १९ लाख ४२ हजार ९६० रुपयांचा ऐवज हस्तगत केला.

आणखी संशयित पोलिसांच्या ‘रडार’वर

दरम्यान, आरोपींनी गैरव्यवहार केलेली उर्वरित रक्कम त्यांच्या परिचयातील काही व्यक्तींना दिलेली असून, ही रक्कम देखील पोलिसांकडून हस्तगत केली जात आहे. ज्यांनी या संशयितांकडून हे पैसे घेतले असतील त्यांनी पोलिस ठाण्यात येऊन रक्कम जमा करण्याबाबत काहींना नोटीस देण्यात आल्या आहेत.

तरीही त्यांनी रक्कम जमा केली नाही तर त्यांना देखील या गुन्ह्यात आरोपी करून अटक करण्याचा इशारा पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी दिला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक सुहास आव्हाड व उज्ज्वलकुमार म्हस्के करीत आहेत.

Police inspector Sandeep Patil and his colleagues with the suspects who committed fraud from the ATM.
Jalgaon Crime News: एकाच वर्गात शिकणाऱ्या मुला-मुलीचे अपहरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.