शाहुनगरात "रात्रीस तलवारी चाले"; 2 गटात घमासान

Gang Fight latest jalgaon crime news
Gang Fight latest jalgaon crime newsesakal
Updated on

जळगाव : शहरातील शाहुनगरात तरुणावर काहीही कारण नसताना तीन जणांनी तलवारीने हल्ला (Sword Attack) करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. याबाबत शहर पोलिस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हाणामारीतील दुसऱ्या गटातर्फे वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत तक्रार दिल्याचे सांगण्यात आले असून सोमवारी (ता. ४) रात्री उशिरापर्यंत दुसऱ्या गटाची तक्रार घेण्याचे काम सुरु होते. (sword fight between 2 groups in Shahunagar Jalgaon Crime News)

इम्रान खान मुस्ताक खान (वय ३३, रा. ताज पानसेंटरजवळ, शाहुनगर) हे रविवारी (ता. ३) पत्नीला भेटण्यासाठी गेंदालाल मिल परिसरात गेले होता. त्यानंतर रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास दुचाकीने घरी येत असताना शाहुनगर रोडकडून जात असताना रस्त्यावर सुमीत पोळ, गोट्या निंबाळकर, गोल्या रणसिंगे हे समोर आले.

तिघांनी इम्रानची दुचाकी अडविली. काहीही कारण नसताना सुमीत पोळ याने तलवार काढून इम्रानच्या डोक्यात टाकली. त्यात तो गंभीर जखमी झाला. मित्राच्या मदतीने इम्रानला जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

सोमवारी सायंकाळी ५ वाजता इम्रानने दिलेल्या जबाबावरून संशयित आरोपी सुमीत पोळ, गोट्या निंबाळकर, गोल्या रणसिंगे यांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस कर्मचारी करीत आहे.

Gang Fight latest jalgaon crime news
Jalgaon : ‘किसान रेक’ला अनुदानाचा अडसर; ठप्प वाहतूकसेवेने शेतकरी अडचणीत

अनेक दिवसांपासून धुसफुस

शाहुनगरात गेल्या अनेक दिवसांपासून दोन गटात धुसफुस सुरू आहे. साधारणत: दोन महिन्यापूर्वी एका व्यावसायिकाच्या घरावर तीन ते चार लोकांनी चॉपरने हल्ला करुन ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.

याप्रकरणी संबंधिताने शहर पोलिसांत तक्रार दिली मात्र, पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. या व्यावसायिकाकडे हल्लेखोरांचे सीसीटीव्ही फुटेजसह संपूर्ण माहिती असून पोलिसांनी तेव्हा हा गुन्हा दडपला नसता तर, कदाचित आजची घटना घडली नसती, अशीही चर्चा शाहुनगरात आहे.

टारगट दारुड्यांची दहशत

शाहुनगर संमिश्र लोकवस्तीचा रहिवास असलेला परिसर आहे. दहा वाजता आस्थापना बंदचे पोलिस अधीक्षकांचे आदेश असताना दोन पोलिस ठाण्यांची हद्द असलेला या भागात अंडाभुर्जीच्या गाड्या, गुटखा विक्रेत्यांची चौकाचौकात गर्दी असते.

चक्क तांबापुरा, गेंदालामील, जैनाबाद, पिंप्राळ्यातून लोक या ठिकाणी गुटखा सिगारेट आणि अंडापाव खाण्यासाठी गर्दी करतात.

ते पोलिसांचेच मित्र

शाहुनगरात दोन्ही पोलिस ठाण्यांच्या पोलिसांचे खबरेच गुन्हेगारी करतात. ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, वाँटेण्ड आहेत अशाच गुन्हेगारांशी पोलिसांची मैत्री असून पोलिस ठाण्यात त्यांची उठबस असल्याने कुठलेही वाद झाले तर, गुन्हा दाखल होऊ नये याची तजवीज अगोदरच केली जाते.

तक्रार झालीच तर, पोलिस मित्र मंडळी आर्थिक देवाण-घेवाणीतून आपसात ‘एरंडोली’ घडवून आणतात, म्हणूनच ते पोलिसांना अधिक जवळचे असल्याची चर्चा शाहुनगरात आहे.

Gang Fight latest jalgaon crime news
हिंदुत्वाच्या मुद्यावर पक्ष सोडला, मग मंत्रिपदासाठी भांडणे का? : खडसेंचा टोला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.