Jalgaon News : तालुक्यातील कोसगाव येथील ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी १४ व्या वित्त आयोगातून धनादेशाद्वारे रक्कम काढून गैरव्यवहार केल्याच्या सदस्यांच्या तक्रारीस अनुसरून सरपंच जय सुरेश तायडे यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे दिलेल्या खुलाशात गावात विकासात्मक केलेल्या कामाची मजुरी मजुराच्या मागणीनुसार त्यांना रोखीने दिल्याचे स्पष्ट केले आहे.(Taide disclosure that wages were paid in cash as per demand of labourers jalgaon news)
तालुक्यातील कोसगाव ग्रामपंचायत सरपंच जय तायडे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, की चौदाव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात केलेल्या विकासात्मक कामाची मजुरी मजुरांच्या मागणीनुसार त्यांना सरपंच व ग्रामसेवक यांच्या संयुक्त नावे धनादेशाद्वारे रक्कम काढून ती रोखीने देण्यात आली असल्याचे नमूद केले आहे.
पत्रकात असेही म्हटले आहे, की त्यावेळी कोविड-१९ चा प्रादुर्भाव सुरू होता. मी नव्यानेच सरपंच झालो असल्याने मला पुरेसे प्रशिक्षण नसल्याने व गवंडी काम करणाऱ्या मजुरांची नावे खाते नसल्याने व त्यांना पैशाची निकड असल्याने त्यांनी केलेल्या कामांची मजुरी त्यांच्या मागणीनुसार रोखीने देण्यात आली असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.