Jalgaon Bribe Crime: सातबारा उतारावर वारसांची नावे लावण्यासाठी लाच घेताना तलाठी व कोतवालास रंगेहाथ अटक

Talathi Salim Tadvi & Mahila Kotwal Kavita Sonavane
Talathi Salim Tadvi & Mahila Kotwal Kavita Sonavaneesakal
Updated on

Jalgaon Crime News : कजगाव ता. भडगाव सातबारा उताऱ्यावर वारसांचे नाव लावण्यासाठी १ हजार ५०० रूपयांची लाच घेणाऱ्या भोरटेक ता. भडगाव येथील तलाठी कार्यालयातील तलाठीसह महिला कोतवालास लाचलुचपत विभागाच्या पथकाने शुक्रवारी १४ एप्रिल रोजी रंगेहात पकडले.

या कारवाईमुळे महसुल विभागात खळबळ उडाली आहे. (Talathi Kotwala arrested red handed while taking bribes to get names of heirs on Satbara slope Jalgaon Bribe Crime news)

भोरटेक ता.भडगाव येथील रहिवासी असलेल्या तक्रारदार शेतकऱ्यांकडे वडीलोपार्जीत जमीन आहे. या जमीनीच्या सातबारा उताऱ्यावर वारसांची नावे लावण्यासाठी तलाठी कार्यालयात अर्ज केला होता.

वारसांची नावे लावण्यासाठी संशयित आरोपी तलाठी सलीम अकबर तडवी वय ४४ रा.भडगाव याने सुरूवातीला १ हजार रूपयांची लाच घेतली होती. त्यानंतर पुन्हा तक्रारदार यांच्याकडे १ हजार ५०० रूपयांची मागणी महिला कोतवाल कविता नंदु सोनवणे वय २७ रा.तांदलवाडी यांनी सोबत केली.

त्यानंतर तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणीसाठी विभागाचे शुक्रवारी १४ एप्रिल रोजी दुपारी सापळा रचला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शासकीय सुटी असली तरी सुट्टीच्या दिवशी शासकीय कामे करण्यासाठी तलाठी आणि कोतवाल हे तलाठी कार्यालयात होते.

त्यावेळी तक्रारदार यांच्याकडून १ हजार ५०० हजार रूपयांची लाच घेतांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे महसुलच्या गोटात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दोन्ही संशयित आरोपींविरुद्ध भडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Talathi Salim Tadvi & Mahila Kotwal Kavita Sonavane
Nashik Bribe Crime : पाथरेचा लाचखोर ग्रामसेवक रंगेहाथ अटक

सदर सापळा जळगाव लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ईश्वर धनगर, राकेश दुसाने, स.फौ. दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, पो.हे.कॉ. अशोक अहिरे,सुनिल पाटील, रविंद्र घुगे, महिला पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना. जनार्दन चौधरी, किशोर महाजन, सुनिल वानखेडे, बाळु मराठे, पो.कॉ. प्रदिप पोळ, सचिन चाटे, अमोल सुर्यवंशी, प्रणेश ठाकुर यांनी यशस्वी केला

दोन दिवसांपूर्वी घेतला होता प्रभारी पदभार

भोरटेक ता भडगाव येथील तलाठी कार्यालय ची अनेक दिवसांपासून जागा रिक्त होती. दरम्यान दोन दिवसांपूर्वी तलाठी सलीम अकबर तडवी याने पदभार घेतला होता. आपल्या प्रशासकीय कामकाज ला शेतकऱ्यांपासून लाचेची मागणी करणार्यापासून या अधिकार्याची अनेक गावांमधून तक्रारी होत्या.

काही शेतकऱ्यांनी विभागीय अधिकारी व भडगाव तहसीलदार यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रारी करण्यात आल्या होत्या. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करीत लाचखोर तलाठी सलीम तडवी यांना अभय देत असल्याचे शेतकऱ्यांनी मध्ये बोललं जात होतं. आता लाचलुचपत विभागाच्या कारवाई मुळे भडगाव महसूल विभागाचा कारभार उघडकीस आला. तलाठी सलीम तडवी ची सखोल चौकशी ची मागणी होत आहे.

Talathi Salim Tadvi & Mahila Kotwal Kavita Sonavane
Dhule Fraud Crime : अपंग युनिट प्रकरणी चौघे न्यायालयीन कोठडीत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.