Jalgaon News : जलकुंभाचे ‘वॉशआऊट’ अन्‌ मुखर्जी उद्यानात तलाव; पाण्यातून दुर्गंधी

Water accumulated in Shyama Prasad Mukherjee Park due to 'washout' after water tank testing.
Water accumulated in Shyama Prasad Mukherjee Park due to 'washout' after water tank testing. esakal
Updated on

Jalgaon News : शहरात पूर्णत्वास आलेल्या अमृत पाणीपुरवठा योजनेंतर्गत श्‍यामाप्रसाद मुखर्जी उद्यानातील जलकुंभाची चाचणी घेण्यात आली. चाचणीनंतर टाकीचे ‘वॉशआऊट’ केले.

मात्र, टाकी उद्यानातच खाली करण्यात आल्याने उद्यानाचा तलाव झाला. दोन-तीन दिवसांत साचलेल्या पाण्यातून दुर्गंधी येत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. (tank was lowered into park due to this park became pond jalgaon news)

जळगाव शहरात गेल्या पाच ते सहा वर्षांपासून अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा व भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. या दोन्ही योजनांच्या कामांचा पहिला टप्पा जवळपास पूर्ण झाला असून, पाणीपुरवठा योजनेंतर्गत झालेल्या कामांची विविध ठिकाणी चाचणी सुरू आहे.

या अंतर्गत मंगळवारी (ता. ४) गिरणा टाकीकडून श्‍यामाप्रसाद मुखर्जी उद्यानाकडे आलेल्या ४०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीच्या चाचणीत एकलव्य क्रीडा संकुलाजवळील व्हॉल्व्ह फुटल्याने महामार्गालगत पाण्याचा तलाव साचला होता, तर तीन दिवसांपासून श्‍यामाप्रसाद मुखर्जी उद्यानातही असाच तलाव साचला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पूर्ण उद्यान पाण्याचे तुडुंब भरले आहे. त्या पाण्यातून आता दुर्गंधी येत असून, रोगराई पसरण्याची शक्यता आहे.

जलकुंभाच्या ‘वॉशआऊट’ने उद्यानात साचले पाणी

यासंदर्भात शहर अभियंता श्री. सोनगिरे यांच्याशी संपर्क केला असता, ते म्हणाले, की अमृत योजनेंतर्गत नव्याने मुखर्जी उद्यानात जलकुंभ उभारला आहे. त्या जलकुंभाची चाचणी घेण्यात आली. ती यशस्वी ठरली असून, त्यातील पाणी बाहेर काढून उद्यानात सोडले आहे. त्यामुळे उद्यानात पाणी साचले आहे. त्याचा लवकरच निचरा होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Water accumulated in Shyama Prasad Mukherjee Park due to 'washout' after water tank testing.
Minister Anil Patil : कार्यकर्त्यांना बळ देणारे नेतृत्व : मंत्री अनिल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.