Jalgaon : वर्गात शिकवत असतानाच शिक्षकाचा हृदयविकाराने मृत्यू

Late Teacher Dilip Suryawanshi
Late Teacher Dilip Suryawanshiesakal
Updated on

चोपडा (जि. जळगाव) : तब्बल नऊ वर्षांपासून विना अनुदान तत्वावर काम करणाऱ्या शिक्षकाचा वर्गात विद्यार्थ्यांना शिकवत असतानाच हृदयविकाराच्या (Heart Attack) झटका येऊन उपचारादरम्यान मृत्यू (Death) झाल्याची घटना चांदसनी- कमळगाव (ता. चोपडा) येथील अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालयात मंगळवारी (ता. २१) घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (Teacher dies of heart attack while teaching in class Jalgaon News)

धानोरा (ता. चोपडा) येथील मूळ रहिवासी व कमळगावच्या अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालयातील विज्ञान शिक्षक दिलीप श्रावण सूर्यवंशी हे २०१३ पासून विना अनुदानीत नैसर्गिक वाढीव तुकड्यांवर सेवारत आहेत. तब्बल नऊ वर्षांपासून या तुकड्यांना अनुदान मिळेल, या आशेने त्यांनी आपले अध्यापनाचे काम सुरू ठेवले होते. आंतरराष्ट्रीय योग दिनी संध्याकाळी चारच्या सुमारास दिलीप सूर्यवंशी यांना वर्गातच हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने दवाखान्यात दाखल केले असता, त्याच दिवशी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गेल्या अनेक वर्षांपासून शासनाने विना अनुदानित शाळांवर मोठा अन्याय केला असून शाळा व वाढीव तुकड्यांना अनुदानापासून वंचित ठेवले आहे.

Late Teacher Dilip Suryawanshi
Jalgaon : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

परिणामी, आर्थिक विवंचनेत सापडलेले शिक्षक व कर्मचारी प्रचंड वैफल्यग्रस्त झाले आहेत. दिलीप सूर्यवंशी यांना याच विवंचनेतून हदयविकाराचा झटका आल्याचे दिसून येत आहे. तीन बहिणींचा एकुलता एक अविवाहित भाऊ गेल्याने त्यांच्या कुटुंबाचा आधारवड गेल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यांच्या पश्‍चात आई, वडील, दोन विवाहित व एक अविवाहित बहीण असा परिवार आहे.

Late Teacher Dilip Suryawanshi
नवलनगरच्या सायकल दुकानदाराची अमळनेरात आत्महत्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.