Teacher Training : उन्हाळी प्रशिक्षणाचा राज्य परिषदेस पडला विसर; जिल्ह्यातील शेकडो शिक्षक प्रतीक्षेत

Teacher
Teacheresakal
Updated on

Jalgaon News : महाराष्ट्र शासनाने वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व संनियंत्रणेची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपवली आहे. मागील वर्षी २०२१-२२ मध्ये हे प्रशिक्षण ऑनलाइन (Online) घेण्यात आले होते. (teachers are waiting for selection category training program for academic year 2023 24 jalgaon news)

प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय अध्यापकाचार्य या चार गटातील शिक्षकांनी नोंदणी करून प्रशिक्षण पूर्ण केले. मात्र २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाचे वरिष्ठ श्रेणी, निवड श्रेणीचे प्रशिक्षण कार्यक्रम अजूनही न लागल्याने शेकडो शिक्षक या प्रशिक्षणाच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे.

यामुळे जिल्ह्यातील अनेक शिक्षकांना प्रशिक्षण नसल्याने वरिष्ठ श्रेणीसाठी सेवेतील १२ वर्षे, तर निवड श्रेणीसाठी सेवेतील २४ वर्षे कालावधी पूर्ण होऊनही याचा लाभ घेता येत नसल्याने अडचणी येत आहेत.

बदलत्या शैक्षणिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नवविचार प्रवाहाच्या अंमल बजावणीसाठी, मूल्यमापन पद्धती आणि साधन तंत्रे यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिक्षकांना सक्षम करणे, शिक्षकांमध्ये प्रभावी शालेय व्यवस्थापन संघटन आणि प्रशासकीय कौशल्यासाठी आवश्यक शैक्षणिक कार्य संस्कृती विकसित करणे, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार शालेय अभ्यासक्रम व शिक्षक शिक्षण अभ्यासक्रमात होत असलेल्या बदलांना सामोरे जाण्यासाठी सक्षम करण्यासाठी शिक्षकांना या सेवांतर्गत प्रशिक्षणाची गरज असते.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Teacher
Bazar Samiti Result Analysis : अमळनेरात महाविकास आघाडीला बूस्टर; भाजपवर चिंतनाची वेळ

या प्रशिक्षणाची जबाबदारी राज्य शासनाने आता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्याकडे दिली आहे. प्रत्येक वर्षाच्या उन्हाळी सुटीत हे प्रशिक्षण जिल्ह्याच्या ठिकाणी घेतले जाते. मात्र यावर्षीचे प्रशिक्षण कधी? कुठे आहे? नावनोंदणी? याबाबत अजून कोणतीच कार्यवाही होताना दिसून येत नसल्याने प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक या प्रशिक्षणाच्या प्रतीक्षेत आहेत.

...असे आहेत निकष

वरिष्ठ व निवड श्रेणी कौशल्य प्रशिक्षणासाठी काही अटींची पूर्तता करणे आवश्यक असते. यात वरिष्ठ श्रेणीसाठी १२ वर्षांची तर निवड श्रेणी २४ वर्षांची अर्हताकारी सेवा पूर्ण असणे आवश्यक असते तर कामकाज समाधानकारक असणे, किमान तीन आठवड्याचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे अथवा विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे अथवा घड्याळी ५० तासांचे ऑनलाइन सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक असते.

मात्र प्रशिक्षणाचाच पत्ता नाही तर प्रशिक्षण घेणार कोठून? शासनाने तसेच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी लक्ष घालून यावर तत्काळ कार्यवाही करावी व लवकर प्रशिक्षण सुरू करावे, अशी मागणी जिल्ह्यातील प्रशिक्षणासाठी पात्र असलेल्या शिक्षकांनी केली आहे

Teacher
Unseasonal Rain Crop Damage : भुसावळसह 3 तालुक्यांत 1880 हेक्टरवर नुकसान; प्रशासनाचा प्राथमिक अहवाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.