Teachers Day : शिक्षकाची संशोधक वृत्तीतून शिक्षण क्षेत्रात भरारी! संकटांवर मात करत केले विद्यार्थी हिताचे उपक्रम

Teacher Day 5 September
Teacher Day 5 September esakal
Updated on

Teachers Day : अतिरिक्त ठरल्याने माध्यमिक मधुन प्राथमिक शाळेत नेमणुक, पत्नीचे अकाली निधन, स्वतःचा झालेला अपघात त्यातच लहानग्या दोन मुलींचा सांभाळ अशी आव्हान पेलत आपली संशोधक वृत्ती व नाविन्याचा ध्यास अबाधित ठेवत डॉ. जगदीश पाटील या शिक्षकाने शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे.

त्यांना यंदाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक पुरस्कार घोषित झाला आहे. (teachers day great work in field of education through research attitude of teachers jalgaon news)

जिल्ह्यातील कंडारी (ता. जळगाव) येथील जिल्हापरिषद शाळेत कार्यरत असलेले डॉ. जगदीश पाटील गेल्या १७ वर्षांपासून अध्यापनाचे कार्य करीत आहेत. ते आधी भुसावळ नगरपालिका माध्यमिक शाळेत कार्यरत होते. मात्र अतिरिक्त झाल्याने शिक्षण विभागाने त्यांची नेमणूक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केली.

डॉ. पाटील हे विद्यार्थी हिताचे विविध उपक्रम राबवितात. शिवाय अभिनव अध्ययन-अध्यापन करत त्यांच्यात शिक्षणाची गोडी निर्माण करतात. तसेच आपल्या अभ्यासू व संशोधक वृत्तीने विषयाचे सखोल ज्ञान घेऊन शिक्षकांना प्रशिक्षण देतात. सोबतच बालभारती, शाळासिद्धी, राज्य मंडळ, मुक्त विद्यालय मंडळ, एससीईआरटी यासारख्या केंद्र व राज्यस्तरीय समित्यांवर काम करीत आहेत.

त्यांचे शिक्षण एमए, बीएड्, पीएचडी, नेट झालेले आहे. बालभारतीच्या आठवी, दहावी व बारावी पाठ्यपुस्तक निर्मितीत त्यांनी मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य म्हणून तसेच मुक्त विद्यालय मंडळातही म्हणून कार्य केले आहे.

एससीईआरटी येथे मराठी विषयासाठी पायाभूत चाचणी निर्मितीत व राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात येत असलेल्या शाळा गुणवत्ता मूल्यांकन आराखडा निर्मितीत ‘एसक्यूएएएफ’मध्ये त्यांचा सहभाग आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Teacher Day 5 September
Teacher Day: शिक्षकाने केला झेड. पी. शाळेचा कायापालट!, प्रदीप पडवल यांच्या सकारात्मक कार्याचे गावकऱ्यांकडून कौतुक

केंद्र शासनाच्या शाळासिद्धी मूल्यांकन कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक व राज्य निर्धारक आहेत. ई-बालभारतीत क्यूआर कोड साहित्यनिर्मिती व विकसन केले असून, व्हर्च्युअल क्लासद्वारे ते राज्यभरातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन पाठ अध्यापन करत असतात. जळगाव डायट व जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या विविध उपक्रमात त्यांचा नेहमी सक्रिय सहभाग असतो.

अध्ययन-अध्यापनात नाविन्यपूर्ण बदल, डिजिटल वर्ग, ज्ञानरचनावाद, कृतियुक्त अध्यापन, स्वाध्याय, अभ्यासमाला, शिकू आनंदे, दीक्षा ॲप, व्होपा स्कूल याद्वारे अध्ययन-अध्यापन करत असतात. तसेच निष्ठा, अभ्यासक्रम, शाळासिद्धी, अध्ययन-अध्यापन यासह विविध विषयांवर राज्यभर ते शिक्षकांसाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य करत असतात.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये रिसर्च पेपर व दैनिकांध्ये सुमारे पाचशेहून अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. संत साहित्य अध्यासन केंद्रात कार्य, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत आकाशवाणीवर मुलाखत, विद्यार्थी व शिक्षकांशी ऑनलाइन संवाद साधून मार्गदर्शन, कोरोना कालावधीत ऑनलाइन व ऑफलाइन अध्ययन-अध्यापन, फोन कॉलद्वारे अभ्यासाची पडताळणी, कोरोना कालावधीत घरोघरी जाऊन तपासणी कार्य, व्याख्यानमालेद्वारे विविध विषयांवर मार्गदर्शन, पाठ्यपुस्तकातील लेखक व कवींची मोबाईलद्वारे संवाद असे नानाविध उपक्रमांतून त्यांनी जिल्ह्यातील शिक्षणक्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे.

डॉ. पाटील यांच्याकडून ‘असे जगावे...’चा वस्तुपाठ

‘असे जगावे छाताडावर आव्हानांचे लाऊन अत्तर...नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, या कवी गुरू ठाकूर यांच्या ओळी डॉ. जगदीश पाटील यांच्या जीवनाशी चपखलपणे जुळतात. वैयक्तिक आयुष्यात आलेली अनेक वादळे सहजपणे परतवून संशोधक वृत्तीतून त्यांनी घेतलेली शैक्षणिक भरारी उल्लेखनीय आहे.

Teacher Day 5 September
Teachers Day : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचे आयुष्य घडवणारे प्रेरणादायी विचार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()