Jalgaon News : तालुक्यातील अंजाळे शिवारातील तापी नदीकाठावरील शेतात सुमारे ८० ते ९० ब्रास डबर गौण खनिजचे दोन साठे महसूल प्रशासनाला आढळल्यावरून तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्यासह महसूल पथकाने धडक कारवाई केली आहे. (team found secondary mineral deposits jalgaon news)
अंजाळे (ता. यावल) या शिवारातील तापी नदीच्या काठावर असलेल्या सचिन भानुदास चौधरी (रा. अंजाळे, ता. यावल) यांच्या गट क्रमांक ५५२ मध्ये १५ ब्रास आणि वसंत तुळशीराम मोरे (रा. कंडारी, ता. भुसावळ) यांच्या शेत गट क्रमांक ५६४ / १ मध्ये ८० ते ९० ब्रास गौण खनिजचा विना परवानासाठा असल्याचे माहिती मिळाली.
यावरुन तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या मागर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, बामणोदच्या मंडळ अधिकारी बबिता चौधरी, यावलच्या मंडळ अधिकारी मीना तडवी, अंजाळे गावाचे तलाठी शरद सूर्यवंशी, फैजपूरचे मंडळ अधिकारी तेजस पाटील, साकळी विभागाचे मंडळ अधिकारी सचिन जगताप, मालोदचे तलाठी टी. सी. बारेला यांच्या पथकाने केलेल्या संयुक्त कारवाई केली. सुमारे अंदाजे एक ते दीड लाख रुपयांचे विनापरवाना साठवण करून ठेवलेले गौण खनिज (डबर) महसूल प्रशासनाने कारवाई करीत जमा केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.