Jalgaon News : चहार्डीच्या महिला सरपंचावर ‘अविश्वास’; चर्चेसाठी 5 फेब्रुवारीला विशेष सभा

गैरकारभाराला कंटाळून अखेर १६ ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्र येऊन तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्याकडे सरपंचावर अविश्वास दाखल केला आहे.
Gram Panchayat member submitting a motion of no confidence to Tehsildar Bhausaheb Thorat.
Gram Panchayat member submitting a motion of no confidence to Tehsildar Bhausaheb Thorat.
Updated on

Jalgaon News : शासनाच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम अभियानात राज्यात प्रथम पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी गौरविलेल्या चहार्डी (ता.चोपडा) येथील विद्यमान सरपंच चंद्रकला दत्तात्रय पाटील यांच्या मनमानी आणि गैरकारभाराला कंटाळून अखेर १६ ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्र येऊन तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्याकडे सरपंचावर अविश्वास दाखल केला आहे. (Tehsildar Bhausaheb Thorat has filed no confidence motion against Sarpanch jalgaon news)

ग्रामपंचायतीच्या एकूण १७ पैकी १६ सदस्यांच्या अविश्वास प्रस्तावावर सह्या असून, चहार्डी ग्रामपंचायतीच्या इतिहासात सरपंच सोडून १६ ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

चोपडा तालुक्यात राजकारणात पुढारलेल्या व लोकसंख्येत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चहार्डी ग्रामपंचायतीची तीन वर्षांपूर्वी सार्वत्रिक निवडणूक होऊन सरपंच म्हणून चंद्रकला दत्तात्रय पाटील यांची निवड झाली. ग्रामपंचायतीचा कारभार स्वीकारल्यानंतर सरपंच चंद्रकला पाटील या मनमानी पद्धतीने कामे करीत असून, ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेत नाहीत. सदस्यांशी भांडणतंटा करून गावातील विकासकामांना अडथळे निर्माण करीत असतात.

Gram Panchayat member submitting a motion of no confidence to Tehsildar Bhausaheb Thorat.
Jalgaon News : विरोधकांना दे धक्का..! गिरीश महाजनांच्या नेतृत्वाचा चाणाक्षपणा

तसेच ठेकेदारांना देखील निष्कृष्ट कामे करण्यास प्रोत्साहन देत असतात आणि स्वतःच्या मुलामार्फत व लोकांमार्फत ठेके स्वीकारण्याचे कामे करून त्या माध्यमातून गैरव्यवहार करतात. तसेच ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कारभारात त्यांचा मुलगा नीलेश दत्तात्रय पाटील हा ढवळाढवळ करीत असतो.

आजपर्यंत सरपंच चंद्रकला पाटील यांनी गावात समाजाभिमुख लोकोपयोगी, असे कोणतेही काम पदाचा वापर करून केलेली नाहीत. त्यामुळे गावाचा सर्वांगीण विकास साधण्यास सरपंच म्हणून चंद्रकला पाटील अपयशी ठरल्या आहेत. शासनाचा चौदावा व पंधरावा वित्त आयोगाचा निधी गावाच्या विकासासाठी व्यवस्थित खर्च केलेला नसून, नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत नागरिकांनी दोन्ही वित्त आयोगाच्या खर्चाचा हिशोब मागितला.

Gram Panchayat member submitting a motion of no confidence to Tehsildar Bhausaheb Thorat.
Jalgaon News : वरणगावात हॉटेल, दुकाने रात्री दहानंतर बंद! शांतता समितीच्या बैठकीत पोलिस प्रशासनाचा निर्णय

मात्र सरपंचांनी त्याचा हिशोब देखील त्यांनी ग्रामसभेला दिलेला नाही म्हणून सरपंच चंद्रकला पाटील या सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी करून गैरकारभार करतात असा आरोप करून त्यांच्या विरुद्ध १६ ग्रामपंचायत सदस्यांनी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला.

...यांच्या आहेत प्रस्तावावर स्वाक्षरी

तहसीलदार थोरात यांनी चहार्डी येथे अविश्वास प्रस्तावावर चर्चेसाठी ५ फेब्रुवारीला विशेष सभा बोलावली आहे. अविश्वास प्रस्तावावर अनिल रामदास पाटील, अलकाबाई किशोर भिल, ललिताबाई जगन्नाथ धनगर, सिंधूबाई नामदेव चौधरी, किरण युवराज मोरे, तुळशीराम धनराज कोळी, स्नेहल उदय पाटील, अर्जुन देवराम कोळी, माधुरी मयूर सोनवणे, क्रांती दगडू पाटील, मनीषा निंबा शेटे, दिनकर त्र्यंबक पाटील, जयश्री दत्तात्रय पाटील, गणेश रमेश पाटील, हर्षदा भूषण कोळी, ज्ञानेश्वर जगन्नाथ पाटील या १६ ग्रामपंचायत सदस्यांच्या सह्या आहेत.

Gram Panchayat member submitting a motion of no confidence to Tehsildar Bhausaheb Thorat.
Jalgaon News : बालिकेसह तिच्या पित्यावर चॉपर हल्ला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.