जळगाव : शहरासह जिल्ह्यात सकाळी थंडी, दिवसभर उन्हाचा (Summer) कडाका, असे तापमान असते. ऋतू बदलामुळे अनेकांना ताप, सर्दीची लागण झाली आहे. (Temperature at 36 degrees in February instead of March result of northern heatwave jalgaon news)
दुसरीकडे मात्र उन्हाचा कडाका जाणवू लागला आहे. मार्चऐवजी फेब्रुवारीमध्येच तापमान ३६ अंशावर पोचले आहे. साधारणत: मार्च किंवा होळीनंतर तापमानात वाढ सुरू होते. यंदा मात्र फेब्रुवारीतच तापमान वाढल्याने आगामी उन्हाळा अत्यंत कडक जाईल, असा अंदाज वर्तविला जात आहे.
दोन- तीन दिवसांपासून दिवसाच्या तापमानात वाढ होत आहे. फेब्रुवारीत थंडी असते. मार्चनंतर उन्हाची तीव्रता वाढत जाऊन मेअखेर जिल्ह्याचे तापमान ४५ ते ४८ अंशांपर्यंत पोचते. त्याला विविध कारणे आहेत.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
यंदा मात्र उत्तरेकडील उष्ण वारे तीव्र वेगाने वाहत आहेत. यामुळे जिल्ह्याचे तापमानही वाढले आहे. उत्तरेकडील उष्णतेच्या वाऱ्यांना नियंत्रणासाठी ‘पश्चिमी विक्क्षोभ’ तयार होतो. तो यंदा फारसा तयार झाला नसल्याने उष्णतेचा परिणाम जळगाव जिल्ह्यात होत आहे.
३ मार्चनंतर तापमानात वाढ
येत्या ३ मार्चपर्यंत कमाल तापमान ३५ ते ३८ अंशादरम्यान राहील. किमान तापमान १६ ते १८ अंशादरम्यान राहील. ३ मार्चनंतर सकाळी पडणारी थंडी बंद होऊन तापमानात वाढ होईल. पुढे उन्हाळा कडक असेल, अशी माहिती हवामान अभ्यास नीलेश गोरे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.