जळगाव : दीक्षितवाडीतील खुल्या जागेत स्थित महापुरुषांचे पुतळे हटविण्याच्या प्रक्रियेदरम्यान संतप्त कार्यकर्ते व समाजबांधवांनी तीव्र विरोध केला.
त्यामुळे तणाव निर्माण झाला. पोलिस प्रशासनाने वेळीच सतर्कता राखत माघार घेतल्यानंतर पुतळा पुनर्स्थापित केल्यानंतर तणाव निवळला. (Tension over removal of Ambedkars statue Strong opposition by angry activists and community members jalgaon news)
शहरातील दीक्षितवाडी परिसरातील बौद्ध वसाहतीजवळ १९८३ मध्ये तत्कालीन नगरपालिका व शासनातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) व तथागत गौतम बुद्ध यांच्या पुतळा बसविण्यात आला आहे.
खासगी जागेवरील पुतळे
खासगी जागेवर असलेला हा पुतळा हटविण्यासाठी पहाटे चारपासून या परिसरात पोलिसांचा कडेकोड बंदोबस्त लावला होता. त्यानंतर पुतळा हटविण्यासाठी विधिवत प्रक्रियेला सुरवात झाली.
हटविण्यास तीव्र विरोध
धार्मिक विधी पार पडल्यानंतर पुतळा हटविण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, ही वार्ता वाऱ्यासारखी पसरल्याने शहरातील विविध भागांतून समाजबांधव त्याठिकाणी आले. त्यांनी पुतळा हटविण्यास विरोध केला. त्याचठिकाणी ठिय्या आंदोलन केल्याने याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?
पोलिसांचा ताफा हजर
अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपअधीक्षक संदीप गावित, स्थानिक गुन्हे शाखचे वरिष्ठ निरीक्षक किसन नजन पाटील, जिल्हापेठ ठाण्याचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, शनिपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक शंकर शेळके यांच्यासह क्यूआरटीचे पथक, असा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला होता. पुतळ्याच्या जागी जमलेले कार्यकर्ते थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर घोषणा देत धडकले.
आंदोलन झाले तीव्र
आंदोलनात समाजबांधव प्रचंड संतप्त झाल्याने प्रशासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पुन्हा त्याचठिकाणी बसविण्याला परवानगी दिली. त्यानंतर धार्मिक विधींसह दुग्धाभिषेक करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्याची पुर्नस्थापना करण्यात आली.
आक्रमक पवित्र्यानंतर महामानवाचा पुतळा बसविण्याचे कामाला सुरवात झाली. सुमारे तासाभरानंतर काम पूर्ण झाले. त्यानंतर समाजबांधवांकडून ढोल-ताशासह फटाक्यांची आताषबाजी करून जल्लोष करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.