Terrorists arrested at Bhusawal railway station
Terrorists arrested at Bhusawal railway station

भुसावळ रेल्वेस्थानकावर अतिरेक्यांच्या अटकेचा थरार

मॉकड्रील असल्याचे लक्षात आल्यावर सर्वांचा जीव भांड्यात
Published on

भुसावळ : सकाळी नऊची वेळ... पोलिसांना रेल्वे स्थानकात अतिरेकी घुसल्याची माहिती मिळते... पोलिस नियंत्रण कक्षाकडून अतिशिघ्र कृती दलाला परिस्थिती हाताळण्याच्या सुचना दिल्या जातात. त्याबरोबरच बॉम्बशोधक व नाशक पथक, दहशतवाद विरोधी पथक, शीघ्र कृती दलाचे पथक रेल्वे स्थानकात पोचून कारवाईला सुरवात केली जाते. काही वेळातच रेल्वे स्थानकात घातपात घडवण्याच्या मनसूब्याने दबा धरुन बसलेल्या अतिरेक्यांना दहशत विरोधी पथक जेरबंद करुन परिस्थितीवर नियंत्रण मिळवते. हा सर्व थरार उघड्या डोळ्यांनी पाहात असतानाच हे मॉकड्रील असल्याचे लक्षात येताच भुसावळकरांचा जीव भांड्यात पडला आणि पोलिस यंत्रणादेखील सज्ज असल्याचे लक्षात आल्याने सुरक्षेची खात्रीदेखील झाली.

शहर व परिसरात रेल्वे स्टेशन, भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरी, आर्मीचे आर्टिलरी सेंटर, दीपनगर येथील औष्णिक विद्युत प्रकल्प ही महत्त्वाची स्थाने आहेत. या ठिकाणी अचानक कोणताही अनुचित प्रकार घडल्यास पोलीस दल सज्ज आहे किंवा नाही, हे तपासण्यासाठी शुक्रवारी (ता. २५) मॉकड्रिल घेण्यात आले. यात रेल्वेस्थानकावर दहशतवाद्यांना पकडण्याचे व इतर अन्य ठिकाणी वेगवेगळी प्रात्याक्षिके करण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी आपत्कालीन परिस्थिती ओढविल्यास पोलीस प्रशासन कशाप्रकारे सज्ज आहे, याची प्रात्यक्षिके करवून घेतली.

ओलीस ठेवलेल्या प्रवाशांची सुटका

रेल्वे स्थानकात काही दहशतवादी आले असून, त्यांनी काही लोकांना ताब्यात घेऊन तेथेच बंदिस्त करून ठेवल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला देण्यात आली. त्यानुसार तत्काळ सर्व पोलीस अधिकारी त्या ठिकाणी पोचले. यावेळी बॉम्बशोधक पथकाची देखील गरज आहे, हे लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी बॉम्ब शोधक पथकाची मागणी केली. काही वेळातच ही पथके त्या ठिकाणी पोचली. सर्वप्रथम पथकाने दहशतवाद्यांनी ज्या ठिकाणी नागरिकांना ओलीस ठेवले, त्या ठिकाणाची माहिती घेतली व तत्काळ अतिशय शिस्तबद्ध कारवाई करून सदर ओलीस ठेवलेल्या इसमांची सुटका केली.

बॉम्बशोधक पथकाच्या कारवाईचा थरार

दरम्यानच्या काळात तेथे असलेल्या पोलिस अंमलदारांनी, तसेच आरसीपी पथकाने संपूर्ण परिसर निर्मनुष्य केला अन्‌ त्यानंतर सुरू झाला बॉम्बशोधक पथकाच्या कारवाईचा थरार. बॉम्बशोधक पथकाने सर्वप्रथम संपूर्ण परिसर निर्मनुष्य झाल्याची खात्री केली. त्यानंतर एक-एक साहित्याच्या साहाय्याने रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमध्ये ठेवण्यात आलेली बेवारस बॅग तपासली. पथकातील डॉगनेदेखील या कारवाईत सहभाग घेत सदरची बॉम्बसदृश्य वस्तू डिफ्युज करण्यात आली. भुसावळ नगरपालिकेकडील वैद्यकीय पथक, ॲम्बुलन्स, फायर ब्रिगेडची गाडीदेखील काही अनुचित प्रकार घडल्यास तत्काळ उपाय योजनेसाठी त्याठिकाणी हजर होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.