जळगाव : शहरातील फुले मार्केटमध्ये खरेदीसाठी आलेल्या चार महिलांच्या पर्समधून रोकड (Cash) लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. गर्दीचा फायदा घेउन चोरटे पुन्हा सक्रिय झाले आहेत. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. (Theft from the purses four women in market crowd Jalgaon Crime News)
शहरातील फुले मार्केटमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी महिला येत असतात. याच गर्दीचा फायदा घेत चोरटे पुन्हा सक्रिय झाले असून शनिवारी (ता. ३०) दुपारच्या सुमारास नलिनी राजधर पाटील (वय ६०, रा. द्वारकानगर) खरेदीसाठी आलेल्या होत्या. त्यांच्या पर्समधून चोरट्याने २० हजार रुपयांची रोकड लांबविली. त्यांनी परिसरात शोधाशोध केली परंतु कुठेही माहिती न मिळाल्याने त्यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार देण्यासाठी गेल्या असता इतर महिलांच्या देखील रोकड व मोबाईल गमाविल्याचे समोर आले. त्यांनी पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राजकुमार चव्हाण करत आहे.
लीना तडवी यांचे ७०० रुपये, संगीता येवले यांची रोकड आणि मोबाईल असा एकूण ३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल तर वैशाली सूर्यवंशी यांची ४ हजार ५०० रुपयांची रोकड याप्रमाणे चारही महिलांचे एकूण ३२ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.