जळगाव : शहरातील भाजीपाला मार्केटसमोरील समर्थ एंटरप्राइजेस येथील काम करणाऱ्या कामगारानेच ७५ हजार रुपये किमतीचे तांब्याची तार (Copper Wire) व इतर साहित्य चोरून नेल्याची घटना समोर आली आहे.
याबाबत गुरुवारी (ता. ९) एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Theft of materials including copper wires from company jalgaon news)
एमआयडीसी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की नीलेश प्रभाकर जोशी (वय ४२, रा. नवीन जोशी कॉलनी)आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. त्यांचे जळगाव शहरातील भाजीपाला मार्केटसमोर समर्थ एंटरप्राइजेस नावाचे दुकान आहे.
त्या ठिकाणी पितळी व कॉपरच्या तारांची विक्री केली जाते. दीपक पंढरीनाथ कोळी (रा. जैनाबाद, जळगाव) हा दुकानात कामाला होता. १५ डिसेंबर २०२२ ते १४ जानेवारी २०२३ दरम्यान दीपक कोळी याने दुकानातून तांब्याची तार व इतर साहित्य असा एकूण ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
हा प्रकार नीलेश जोशी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी दीपक कोळी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक दत्तात्रय बडगुजर करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.