Jalgaon News : पोलिस लाइनशेजारीच घरफोडी; साडेसहा लाखांवर ऐवज लंपास

house robbery
house robberyesakal
Updated on

जळगाव : शाहूनगर ट्रॅफिक गार्डनच्या मोकळ्या जागेत रात्रभर टवाळखोरांचे अड्डे बहरलेले असतात. शहर पेालिस ठाणे असो की जिल्‍हापेठ, या परिसरात पोलिस गस्तीवर येत नाही. परिणामी, चोऱ्यांत वाढ होत आहे. चक्क पोलिस लाइनशेजारीच दत्त कॉलनीतील कलंत्री यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी सहा लाखांचा ऐवज लंपास केला आहे. (Thieves broke into closed house in Dutt Colony next to police line looted six lakhs jalgaon crime news)

सीए राजेश रमेश कलंत्री दत्त कॉलनीत कुटुंबासह वास्तव्यास आहेत. काही दिवसांपूर्वी मुलगी नेहा सीएची परीक्षा उत्तीर्ण झाली. त्यामुळे तिचा सत्काराचा कार्यक्रम हा कलंत्री यांच्या बीड येथील सासूरवाडीत आयोजित करण्यात आला होता.

त्यानुसार कलंत्री कुटुंबीय गुरुवारी सकाळी बीडसाठी रवाना झाले होते. शुक्रवार (ता. २७) सकाळी घरकाम करणारी महिला कामावर आल्यावर तिला कडीकोयंडा आणि कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसून आले.

महिलेने लागलीच कलंत्री यांचे मावसभाऊ स्वप्नील लाठी यांच्याकडे धाव घेऊन घरात चोरी झाल्याची माहिती दिली. लाठी यांनी राजेश कलंत्री आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. काही मिनिटांनी स्थानिक गुन्हे शाखेसह जिल्हापेठ पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

house robbery
Jalgaon Crime News : पोलिसांनी पकडली वाळूची चोरटी वाहतूक

दागिन्यांसह रोकड गायब

चोरट्यांनी घरामधून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह एक लाख ७० हजार रुपये रोख, दो लाख ७० हजारांचे नऊ तोळे सोने, ७० हजार रुपये किमतीचे दीड-दोन किलो चांदीचे भांडे, एक लाख रुपयांची हिऱ्याची अंगठी असा एकूण सहा लाख दहा हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

एक लाख ३४ हजार वाचले

कलंत्री कुटुंबीयांनी कपाटात एक लाख ३४ हजार रुपये रोख सांभाळून ठेवली होती. सुदैवाने ती रक्कम चोरट्यांच्या हाती लागली नाही. त्यामुळे ती रक्कम सुरक्षित राहिली.

house robbery
Cyber Crime : वीजबिल अपडेट करण्याच्या नावाखाली वृद्धाची फसवणूक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.