Jalgaon Crime : मुख्यमंत्री दौर्यात पोलिस थकले अन्‌ चोरट्यांनी मारली बाजी

Broken hinge of back door of SSD Mobile showroom & mobile extended closet.
Broken hinge of back door of SSD Mobile showroom & mobile extended closet.esakal
Updated on

जळगाव : शहरातील गोलाणी मार्केटसमोरी वाघ चेंबरमधील एस.एस.डी. मोबाईल दुकानाचे कुलप तोडून चोरट्यांनी महागडे सहा मोबाईल, ॲपल वॉच व इतर साहित्य, असा एकूण सहा लाख २६ हजारांचा माल लांबविला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (Thieves broke showroom mobile phones theft worth six half lakh Stolen Jalgaon Crime Latest Marathi News)

सिंधी कॉलनीत विनीत कैलासकुमार आहुजा यांचे गोलाणी मार्केटसमोरील वाघ चेंबरमध्ये श्री एसएसडी मोबाईल नावाचे दोन मजली शेारूम आहे. विनीत व त्यांचा लहान भाऊ रोहित दुकान सांभाळतात. मंगळवारी (ता. २०) रात्री साडेनऊला रोहित आहुजा दुकान बंद करून घरी निघून गेले.

बुधवारी (ता. २१) सकाळी दुकानाशेजारी असलेल्या ऑल इन वन स्टोअर्सचे मालक जयेश पोपटानी यांनी विनीत आहुजा यांना भ्रमणध्वनीवरून त्यांच्या दुकानाच्या शटरचे लॉक तोडले असल्याचे दिसत असून, दुकानात चोरी झाल्याचे सांगितले. त्यानुसार विनीत व त्यांचा भाऊ दुकानाकडे आले.

पाहणी केली असता, दुकानातील चॅनल गेटच्या लॉकच्या पट्ट्या तोडून शॉपमध्ये प्रवेश करून चोरट्यांनी वरच्या मजल्यावरील विक्रीस असलेले महागडे सहा मोबाईल, दोन ॲपल वॉच, एक एअर पॉट यासह दुकानातील डीव्हीआर बॉक्स, तसेच ६ हजार रुपयांची रोकड, असा एकूण ६ लाख २६ हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे समोर आले. याबाबत विनीत आहुजा यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोन चोरट्यांविरोधात शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Broken hinge of back door of SSD Mobile showroom & mobile extended closet.
Navratrotsav 2022 : सह्याद्री- राजमुद्राच्या दांडियासाठी 60 हजार चौरस फुटाचे मैदान

मुख्यमंत्री दौऱ्याचा थकवा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी (ता. २०) जळगाव दौऱ्यावर असल्याने सलग दोन दिवसांपासून पोलिस दलाची धावपळ सुरू होती. पाळधी, जळगावनंतर मुक्ताईनगर असा दौरा असल्याने बंदोबस्त अन्‌ धावपळीत पोलिस थकल्याची जाणीव चोरट्यांना असल्याने त्यांनी चक्क भरबाजारातील महागड्या मोबाईलचे शोरूम फोडून साडेसहा लाखांचा ऐवज लांबविला.

Broken hinge of back door of SSD Mobile showroom & mobile extended closet.
नाशिककरांचा अन्नदानाकडे कल; 500 ते 1 हजार जणांना दररोज मिळते अन्न

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.