Jalgaon Crime News : मालकाची जिरविण्यासाठी पेट्रोल चोरट्यांचा प्रताप! नवीन दुचाकी विकली 40 हजारांत

Bike for sale online
Bike for sale online esakal
Updated on

Jalgaon Crime News : दुचाकीचे रोजच पेट्रोल चोरीला जात असल्याने गाडीमालकाने रात्री घरी आल्यावर पेट्रोल काढून घेण्याचा मार्ग अवलंबला.

परिणामी, चोरट्यांनी गाडी मालकाची जिरविण्यासाठी चक्क दीड लाखाची गाडी सोशल साईटवर ४० हजारांत विक्रीला काढली. दिवसभर शंभर, दीडशे फोन आल्यामुळे गाडीमालक रडकुंडीला आला. (Thieves sold car worth 1 5 lakh for 40000 on social site jalgaon crime news)

उस्मानिया पार्क भागातील वसीम हाशीम आतार (वय ३०) यांनी एक लाख २० हजार रुपयांची दुचाकी (एमएच १९, डीडब्लू ४४२१) खरेदी केली. दिवसभर फिरस्ती असल्याने आणि गाडीच्या मॉडेलनुसार किमान दोन लिटर पेट्रोल गाडीत असणे आवश्यक असल्याने त्यांच्या दुचाकीत रोजच दहा लिटरच्या जवळपास पेट्रोल राहत होते.

मात्र, घराच्या कंपाऊंडमध्ये उभ्या दुचाकीतून रोजच पेट्रोल चोरीला जात असल्याने वसीम शेख यांनी स्वतःच पेट्रोल काढून घेण्यास सुरवात केली. परिणामी, चोरट्यांना गाडीतून पेट्रोल चोरता येईना.

रोजचे ५-६ लिटर पेट्रोलचे नुकसान होत असल्याने चोरट्यांनी ओएलएक्स या खरेदी-विक्री सोशल साईटवर त्या दुचाकीचे छायाचित्र व वसीम आतार यांच्यासह हुजैफ कादरी आणि अनिस शेख यांचे मोबाईल क्रमांक अपलोड केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Bike for sale online
Jalgaon Fraud Crime : रेल्वेत नोकरीच्या आमिषाने 7 युवकांची फसवणूक; 20 लाखांचा गंडा

या तिघांना चाळीस हजारांत गाडी खरेदी करण्यास इच्छुक असलेल्यांचे दिवसभरातून चक्क शंभर ते दीडशे कॉल्स आले. गाडी विकायची नाही, म्हटल्यावर संबधितांकडून शवीगाळ आणि दमदाटीही होऊ लागली.

पोलिसांत तक्रार

दिवसभर येणारे फोन आणि शिवीगाळमुळे मेटाकुटीस आलेल्या गाडीमालक वसीम आतार यांनी अखेर शहर पोलिस ठाणे गाठून कैफियत मांडली. पोलिसांना तक्रार दिल्याची माहिती पसरताच अचानक साईटवरून त्या दुचाकीचे छायाचित्र डिलीट झाले असून, शहर पोलिस त्या संशयितांचा शोध घेत आहेत.

Bike for sale online
Jalgaon Crime News : खेडी, बांभोरी, सावखेड्यात अवैध वाळूसाठ्यावर छापे; 250 ब्रास साठा जप्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.