Jalgaon News : पांढरे सोने लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Police team with suspects arrested in cotton theft case
Police team with suspects arrested in cotton theft caseesakal
Updated on

तरवाडे (जि. जळगाव) : गिरणा पट्ट्यात उभ्या शेतातून कापूस चोरीला जाण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर समोर आल्या आहेत. या चोरीच्या घटनांचा छडा लावण्यासाठी पोलिस मागावर असताना रांजणगाव येथील शेतकऱ्यांच्या घरातून सात क्विंटल कापसाची चोरी करणारे चोरटे दीड महिन्यानंतर पोलिसांच्या हाती लागले आहेत. या प्रकरणी पाच संशयितांना अटक करण्यात आली आहे. (Thieves stole 7 quintals of cotton from farmers house Ranjangaon were caught by police after month and half jalgaon news)

रांजणगाव येथे १८ डिसेंबरच्या रात्री मनोहर पाटे यांच्या घराचा कडी- कोयंडा तोडून घरात ठेवलेला सात क्विंटल कापूस लंपास केला होता. त्या संदर्भात १९ डिसेंबरला चाळीसगाव ग्रामीण पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानुसार पोलिसांनी तपासचक्रे फिरवत संशयित अजय पाटील, प्रकाश (मुन्ना) पाटील, शालिक पाटील, सुरेश (पप्पू) कोष्टी (रा. रांजणगाव) व चंद्रकांत (बंटी) मोरे (रा.पिलखोड) यांनी महिंद्रा पिकअप (एमएच ०४, डीके ४६१०) या वाहनाच्या साह्याने घरातील कापूस चोरून नेला व पिलखोड येथील व्यापारी पवन महाले यांच्याकडे ठेवून आम्ही नंतर पैसे घेऊन जाऊ, असे सांगून गेले.

याबाबत पोलिसांना माहिती मिळताच कापसासह महिंद्रा पिकअप वाहन जप्त करून संशयितांना ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

Police team with suspects arrested in cotton theft case
Jalgaon News : DPDCचा 50 टक्केही खर्च नाही? खर्च न झाल्यास कारवाईचा इशारा

पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक लोकेश पवार, कर्मचारी राजेंद्र साळुंखे, नंदलाल परदेशी, शंकर जंजाळे, मनोज पाटील, संदीप माने, भूपेश वंजारी यांच्या पथकाने संशयितांना मुद्देमालासह ताब्यात घेतले. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेला कापूस चोरट्यांनी लंपास केला. मात्र, पोलिसांनी घटनेचा मोठ्या शिताफीने टोळीला गजाआड केले. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

इतरही गुन्हे उघड होण्याची शक्यता

शेतकऱ्यांनी राबराब राबून मोठ्या कष्टाने व अस्मानी-सुलतानी संकटांना तोंड देत नुकसानीचा मार सहन करीत शेतात पिकविलेल्या पांढऱ्या सोन्यावरच आता चोरट्यांनी डल्ला मारून कष्टकऱ्यांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीला अटक करून चोरीसाठी वापरलेले वाहनही जप्त केले आहे.

हा गुन्हा उघडकीस आल्याने इतर चोऱ्यांचाही छडा लागेल, या अपेक्षेने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पोलिसांनी सखोल तपास करून आणखी गुन्हे उघडकीस आणावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Police team with suspects arrested in cotton theft case
Jalgaon News : संगणक परिचालकपदाची परीक्षा घेण्यास नकार; चौकशीची मागणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.