भादलीगाव रात्रभर चोरट्यांच्या ताब्यात

theft
theft esakal
Updated on

जळगाव : भादली (ता. जळगाव) येथील मशीद रोड आणि रडेवाडा या दोन वस्त्यांमध्ये एकामागोमाग एक अशा पाच बंद घरांसह दोन दुकाने फोडल्याचा प्रकार उघडकीस आला. यात सात ठिकाणाहून चोरट्यांनी दागिने, रोकडसह लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

भादली येथे मध्यरात्री चोरट्यांनी एका मागोमाग सात बंद घरे फोडली. गावातील घर, दुकान एक असलेल्या दोन दुकानांचा समावेश आहे. गावातील मशीद रोडवरील राजेंद्र रमेश चौधरी, दीपक जनार्दन चौधरी आणि तुळशीदास श्रावण चौधरी, रडेवाडा येथील रामचंद्र बाबूराव रडे, चिंधू वामन रडे यांची बंद घरे फोडून दागिन्यांसह रोकड लांबविली, तर काशिनाथ सखारा रडे यांचे किरणा दुकान आणि योगेश हेमचंद्र झांबरे यांचे श्रीराम ॲग्रो ट्रेडर्स अशी दोन दुकानेही फोडून दुकानातून मिळेल त्या मालासह रोकड पळविण्यात आली.

भीतीचा बाऊ की...

भादली येथील भोळेवाडा येथे पती-पत्नीसह त्यांच्या दोन चिमुकल्यांचा खून करण्यात आल्याची घटना २० मार्च २०१७ ला घडली होती. या खुनाचा पूर्णपणे उलगडा अद्यापही झालेला नाही. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये भीतीही प्रचंड असून, शेजारी काय घडतेय, यापेक्षा कुटुंबासह आपण स्वतः सुरक्षित आहोत, यालाच सर्वाधिक महत्त्व असल्याने एखाद्याला कानोसा लागलाही असला, तरी त्याने उठून बघण्याची हिंमतच केली नसेल, असेही ग्रामस्थांच्या चर्चेतून पुढे आले.

तीन दुचाकीवर सहा चोरटे

पहाटे रडे गल्लीत राहणाऱ्या गृहिणीला तीन दुचाकींवर सहा संशयित तरुण जाताना दिसले होते. कोणीतरी असतील, म्हणून त्यांनी दुर्लक्ष केले आणि दिवस उजाडल्यावर गावात चोरीची बोंब उठल्यावर त्या गृहिणीने दुचाकीस्वारांची माहिती सांगितली. घटनेची माहिती कळताच नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. एका मागून एक घरांचा पंचानामा करण्यात येऊन तक्रार नोंदवली जाणार आहे.

theft
धावत्या रिक्षात जेष्ठ पत्रकाराचा मोबाईल लंपास

तांत्रिक पुराव्यांचे संकलन

घटनेचे वृत्त कळताच भुसावळ उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांसह ठसे तज्ज्ञ आणि श्वानपथक आणि फॉरेन्सिक व्हॅन घटनास्थळावर दाखल होऊन पुराव्यांचे संकलन करण्याचे काम सुरू होते. स्कॉड पथकही घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा करण्याचे काम सुरू होते. परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज संकलित करण्यात येत असून, त्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

theft
जळगाव : पुन्हा 2 सराफ व्यापाऱ्यांना कामगाराने लुटले

कटरच्या साह्याने तोडली कुलपे

चोरट्यांनी घराचे कुलूप तोडण्यासाठी कटरचा वापर केल्याचे आढळून आले असून, कुलूप तोडून त्यांनी घराच्या दरवाजाच्या बाहेर ठेवले होते. वेगवेगळ्या घरातील कपाटातील सामान अस्तव्यस्त फेकून दागिने, रोकडसह मौल्यवान वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()