जळगाव : वडिलांचे निधन झाल्याने घराला कुलूप लावून मूळगावी होळ (ता. पाचोरा) येथे गेलेल्या गणेश पाटील यांचे बंद घर चोरट्यांनी फोडून सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड, असा एकूण ३५ हजारांचा ऐवज लंपास केला.
वडिलांचे निधन झाल्यामुळे निमखेडी शिवारातील अनुपम सोसायटीतील गणेश पाटील (वय ४५) कुटुंबीयांसह रविवारी (ता. ११) रात्री दीडला घराला कुलूप लावून होळ (ता. पाचोरा) येथे गेले होते. अंत्यविधी, दशक्रियासह तब्बल १८ दिवस पाटील यांचे घर बंद होते. (Thieves theft on locked house 35 thousand seized by thieves jalgaon crime news)
चोरट्यांनी घराची रेकी करून घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील स्वयंपाक घरापासून ते बैठक हॉलपर्यंत सर्वत्र घरातील साहित्य अस्ताव्यस्त करत चोरट्यांनी निवांतपणे चोरी केली.
दरम्यान, धार्मिक कार्यक्रम आटोपून गणेश पाटील बुधवारी (ता. २८) सकाळी दहाला कुटुंबासह घरी परतले. त्यांना घराच्या मुख्य दाराचे कुलूप आढळले नाही. आत प्रवेश केल्यावर सामान अस्ताव्यस्त पडल्याने चोरी झाल्याची त्यांची खात्री झाली.
तत्काळ त्यांनी तालुका पोलिसांना घटना कळविली. तालुका पोलिसांनी पाहणी केल्यावर दोन्ही मजल्यांवरील खोल्यांमध्ये चोरट्यांनी साहित्य अस्ताव्यस्त फेकल्याचे आढळून आले. ठसे तज्ज्ञांना पचारण करून पुरावे संकलित करण्यात आले.
हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....
दुसऱ्या मजल्याच्या खोलीत लोखंडी कपाट फोडून २२ हजारांची रोकड, सहा ग्रॅम सोन्याचे टोंगल, एकभार वजनी कंबरेचा छल्ला व इतर १३ हजारांचे दागिने, असा एकूण ३५ हजारांचा ऐवज चोरीला गेल्याचे आढळून आले.
याबाबत गणेश पाटील यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार अनिल मोरे तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.