Jalgaon Crime News : खडके बुद्रुक (ता. एरंडोल) येथील अनाथ बालकांच्या बालगृहातील मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात गुरुवारी (ता. ३) रात्री एका अल्पवयीन पीडित मुलीने तक्रार दिल्याने संस्थेचे अध्यक्ष, शिक्षक, बालकल्याण समितीचे अध्यक्ष व बालकल्याण समितीचे सदस्य अशा सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बालगृहातील अनाथ मुलगा व पीडित मुलींनी लैंगिक अत्याचाराची तिसरी तक्रार दाखल केल्याने यातील आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. (third case of torture was registered against girl in Kharge Children Home Jalgaon Crime News)
दरम्यान, बालगृहातील अत्याचार प्रकरणी विविध सामाजिक संघटनांनी मोर्चे काढून आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.
खडके बुद्रुक येथील (कै.) यशवंतराव बळिराम पाटील शिक्षणप्रसारक मंडळ संचालित अनाथ मुलांचे व मुलींचे बालगृहातील अल्पवयीन मुली व एका मुलाने बालगृहाच्या काळजीवाहक पदावर असलेल्या गणेश शिवाजी पंडित याने लैंगिक अत्याचार करून अनैसर्गिक कृत्य केल्याची तक्रार केल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती.
अल्पवयीन मुलींनी दिलेल्या तक्रारीनंतर काळजीवाहक गणेश पंडित, त्याची पत्नी तथा बालगृहाची अधीक्षिका अरुणा पंडित यांच्यासह संस्थेच्या सचिवाविरोधात गुन्हा दाखल होऊन गणेश पंडित व अरुणा पंडित यांना पोलिसांनी अटक केली; तर संस्थेचे सचिव फरारी झाले आहेत. दरम्यान, गुरुवारी रात्री उशिरा पुन्हा एका पीडित अल्पवयीने मुलीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
या घटनेकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत बालकल्याण समितीचे अध्यक्ष, सदस्य, संस्थेचे अध्यक्ष व एका शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या पीडित अल्पवयीन मुलीने गुरुवारी दिलेल्या तक्रारीत बालगृहाचा काळजीवाहक गणेश पंडित याने केलेल्या अत्याचाराची माहिती दिली.
अल्पवयीन मुलीच्या जबाबावरून संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर ऊर्फ दादाजी पाटील, काळजीवाहक गणेश पंडित, शिक्षक प्रताप पाटील, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा देवयानी गोविंदवार, सदस्या विद्या बोरणारे, सदस्य संदीप पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालगृहातील अल्पवयीन मुले व मुली यांच्यावर झालेल्या अत्याचाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा ठपका बालकल्याण समितीचे अध्यक्ष व सदस्यांवर ठेवण्यात आला.
खडके येथील बालगृहातील लैंगिक अत्याचार प्रकरण गेल्या आठवड्यात उघडकीस आल्यावर चाळीसगाव विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, अमळनेर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील नंदवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सतीश गोराडे, सहायक निरीक्षक गणेश अहिरे, उपनिरीक्षक शरद बागल तपास करीत आहेत.
संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर पाटील यांच्यासह त्यांच्या मुलांकडे पीडित अल्पवयीन मुली व मुलाने तक्रार केल्यावरही त्यांनी या गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष करून संशयितास पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याची संतप्त प्रतिक्रिया सर्वत्र व्यक्त केली जात आहे. अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण, अत्याचार प्रकरणामुळे संतप्त झालेल्या विविध संघटनांनी निषेध मोर्चे काढून आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.