Bharatiya Chhatra Sansad : तेरावी भारतीय छात्र संसद यंदा पुण्यात; एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट पुण्यातर्फे आयोजन

Bharatiya Chhatra Sansad
Bharatiya Chhatra Sansad
Updated on

Bharatiya Chhatra Sansad : भारतीय छात्र संसद फाउंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी- पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तीनदिवसीय १३ वी भारतीय छात्र संसद यंदा एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी- पुणे येथे आयोजित केली आहे.

ही छात्र संसद १० ते १२ जानेवारीदरम्यान होणार असल्याची माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्रा. गणेश मंत्री यांनी बुधवारी (ता. २०) पत्रकार परिषदेत दिली. (Thirteenth Bharatiya Chhatra Sansad in Pune this year jalgaon news)

कांताई सभागृहात आयोजित पत्र परिषदेस माजी महापौर जयश्री महाजन, डॉ. प्रीती अग्रवाल, भारतीय छात्र संसदचे राज्य विद्यार्थी समन्वयक विराज कावडिया आदी उपस्थित होते. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय, क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय आणि मानवाधिकार, लोकशाही, शांतता व सहिष्णुतासाठीचे युनेस्को अध्यासन यांच्या सहकार्याने ही छात्र संसद होत आहे.

तेराव्या भारतीय छात्र संसदेचे उद्‍घाटन १० जानेवारीला सकाळी अकराला होईल. माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, यूके पार्लमेंट हाउस ऑफ लॉर्डचे सदस्य मेघनाद देसाई, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, व्हरमौंट विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. सुरेश गरिमला आणि प्रसिद्ध व्यावसायिक सल्लागार प्रा. राम चरण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. १२ जानेवारीला समारोप होईल.

Bharatiya Chhatra Sansad
Jalgaon Abhay Yojana : महापालिकेच्या ‘अभय शास्ती’ योजनेस 31 पर्यंत मुदवाढ; दिवसभरात साडेतीन कोटी कर भरणा

छात्र संसदेत सहा सत्रे होणार असून, ज्यात पहिले सत्र राजकारणातील युवा नेतृत्व-वक्तृत्व किंवा वास्तव, दुसरे सत्र युगांतर- संक्रमणातील तरुण, सत्र ३ : लोकशाही २.० एआय आणि सोशल मीडिया गेम कसे बदलत आहेत? सत्र ४ : आमच्या संस्कृतीत लोककलेची शक्ती, सत्र ५ : डेटा, विविधता आणि लोकशाही- कास्ट जनगणना द्विधा आणि सत्र ६ : आपण चंद्रावर उतरलो; पण जमिनीवर महिला सुरक्षित आहेत? असे होते. याशिवाय विशेष ‘यूथ टू यूथ कनेक्ट’ सत्रांचेही आयोजन केले गेले आहे.

यात राज्यसभेचे खासदार व अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष इम्रान प्रतापगडी, आध्यात्मिक गुरू स्वामी मुकुंदानंद, इतिहासकार आणि स्तंभलेखक डॉ. विक्रम संपत, राज्यसभा टीव्हीचे प्रमुख संपादक गुरूदीपसिंग सप्पल, उद्योजक रणवीर अल्लाबदिया, भारतीय मानवाधिकार कार्यकर्ता डॉ. स्नेहल रशीद, कवी मनोज मुंतशीर, खासदार मनोजकुमार झा, राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या व अभिनेत्री खुशबू सुंदर, मुंबई उच्च न्यायालयाच्या वकील आभा सिंग, डॉ. टेसी थॉमस आणि राज्यसभेच्या सदस्य डॉ. फौजिया खान यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक दिग्गज तीन दिवस चालणाऱ्या छात्र संसदेत संबोधित करणार आहेत. यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ७ जानेवारीपर्यंत नावनोंदणी सुरू आहे. सहभागी होण्याचे आवाहन या वेळी त्यांनी केले.

Bharatiya Chhatra Sansad
Teacher Bharti: उत्तर महाराष्ट्रातील शिक्षकांची साडेचार हजारांहून अधिक पदे; शिक्षण आयुक्तांकडून हिरवा कंदील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.