यंदाही शैक्षणिक कॅलेंडर कोलमडण्याची भीती !

सर्व घोळांवर एकत्रित तोडगा काढणे आवश्यक आहे
यंदाही शैक्षणिक कॅलेंडर कोलमडण्याची भीती !
Updated on



जामनेर : एरवी दहावी व बारावीच्या परीक्षांचे (Exam) निकाल जून महिन्यात जाहीर होऊन त्यानंतर अनुक्रमे अकरावी आणि बारावीनंतरच्या प्रवेशप्रक्रियांची (Admissions) सुरवात होते. विशेषतः बारावीच्या निकालानंतर (HSC exam) अभियांत्रिकी, वैद्यकीय, वैद्यकशास्त्र, एलएलबी व आर्किटेक्चरसारख्या अभ्यासक्रमांची सीईटी होते. जेईई व नीट यांसारख्या केंद्रीय पातळीवरील परीक्षा होतात. मात्र, यंदा कोरोनाच्या (corona) पार्श्‍वभूमीवर दहावीच्या परीक्षाच रद्द करण्यात आल्याने, तर बारावीच्या परीक्षाही रद्द होण्याच्या मार्गावर असल्याने पुढील वर्षातील शैक्षणिक कॅलेंडर (Academic calendar) कोलमडून पडण्याची भीती विद्यार्थ्यांसह पालकांच्या मनात निर्माण होत आहे.

(this year academic schedule may be collapse)

यंदाही शैक्षणिक कॅलेंडर कोलमडण्याची भीती !
पालक, विद्यार्थी, शिक्षकांची यंदाही ‘ऑनलाइन’तून सुटका नाही

यंदा मार्चपर्यंत चाललेल्या अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेलाही पुढील वर्षी असाच फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या चालू शैक्षणिक वर्षातील अभ्यासावर होण्याची भीती पालकांना आहे. शैक्षणिक वर्ष उशिराने सुरू होताना अभ्यासक्रम कसा वेळेत पूर्ण करणार, असा प्रश्न शिक्षकांसह प्राध्यापक मंडळी उपस्थित करीत आहेत. कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत राज्य शिक्षण मंडळाच्या बारावी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलून त्या मे किंवा जून महिन्यात घेण्यात येणार असल्याने त्याचा निकाल प्रचलित पद्धतीनुसार ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये अपेक्षित आहे. नेहमीच्या पदवी प्रवेशाच्या शैक्षणिक वेळापत्रकाचा अंदाज घेतल्यास तोपर्यंत निम्म्याहून अधिक प्रवेशप्रक्रिया पूर्ण झालेली असते. मात्र, यंदा ती सुरूच सप्टेंबरमध्ये होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

एकच धोरण आवश्यक

राज्य सीईटी परीक्षांचे वेळापत्रक राज्य मंडळाच्या वेळापत्रकाप्रमाणे बदलले तरी जेईई, नीट यांसारख्या केंद्रीय प्रवेश प्रकियांचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दहावी व बारावीच्या परीक्षा रद्द किंवा उशिराने होण्याचा फटका केवळ पदवी परीक्षांनाच नव्हे, तर आयटीआय, पॉलिटेक्निक अशा अभ्यासक्रमांनाही बसेल. त्यामुळे एक तर शासनाने प्रवेशप्रक्रियांसाठी एकच धोरण राबविण्याचा निर्णय घ्यावा, अन्यथा शैक्षणिक राज्य मंडळाच्या परीक्षांना विलंब झाला तरी त्याचे प्रवेशाचे शैक्षणिक कॅलेंडर बिघडणार नाही त्याची काळजी घ्यावी, असे मत प्राध्यापक व्यक्त करत आहेत.

यंदाही शैक्षणिक कॅलेंडर कोलमडण्याची भीती !
आश्चर्यच ना..तक्रार न देताच चोरीला गेलेली सायकल पून्हा आली दारी !


कृतिआराखडा आवश्यक...
शिक्षण विभाग, उच्च तंत्रशिक्षण विभाग आणि शिक्षणतज्ज्ञ यांनी या सर्व घोळांवर एकत्रित तोडगा काढणे आवश्यक असल्याचे मत सध्या पालकवर्गातून व्यक्त केले जात आहे. बारावीच्या परीक्षा झाल्याच तर ऑनलाइन मूल्यांकन, निकालाचा कालावधी, प्रवेशप्रक्रियेचा कालावधी यात कपात करून शैक्षणिक वर्ष सुरळीत करता येते का? यावर अभ्यास व आताच कृतिआराखडा तयार करणे आवश्यक असल्याने मत पालकासह शिक्षणतज्ज्ञांकडून मांडले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()