Jalgaon Rain Update : चाळीसगाव तालुक्यात वरुणराजाची अवकृपा; मागील वर्षीच्या तुलनेत यंदा निम्माच पाऊस

farmer
farmeresakal
Updated on

स्वप्नील वडनेरे : सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Rain Update : पावसाळा सुरू होऊन जवळपास दोन महिने झाले असले तरी तालुक्यात मात्र पावसाने पाठ फिरवली आहे. राज्यभरातील अनेक ठिकाणी पावसाने सरासरी ओलांडली असली तरी चाळीसगाव तालुक्यात मात्र पावसाची अवकृपा पाहायला मिळत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा खूप कमी आहे.

मागील वर्षी ३१ जुलै २०२२ पर्यंत तालुक्यात ३९४.५६ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली होती. ()

परंतु मागील वर्षातील जुलै महिन्याच्या आकडेवारीत आणि यंदाच्या जुलैच्या आकडेवारीत १७२.६ मिमी पावसाची तफावत निर्माण झाली आहे. ३१ जुलै २०२३ अखेर चाळीसगाव तालुक्यात फक्त २२२.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

एकीकडे धरणात जलसाठ्याची आवक वाढत असली तरी शेतीशिवारात मात्र पावसाचे प्रमाण कमी असल्याने त्याचा परिणाम रोपांच्या वाढीवरही झाला आहे. वाढती मजुरी, दुसरीकडे कपाशीवर लाल्या रोगाचे आक्रमण अशा विविध संकटांचा सामना बळीराजाला करावा लागत आहे. त्यामुळे चांगला पाऊस येईल, या आशेवर बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

farmer
Jalgaon Inspirational News : ‘तो’ जिद्दीने लढला अन् जिंकाला! एका उच्चशिक्षित तरुणाचा प्रेरणादायी लढा...

‘गिरणा’तील साठ्यात वाढ

नाशिक जिल्ह्यात गिरणा उगम क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने चणकापूर, पुनद, ठेंगोडा या प्रकल्पामधून गिरणा धरणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गिरणा धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून, गिरणा धरणाचा जलसाठा ३३ टक्क्यांवर पोहोचला आहे. गिरणा धरणाच्या साठ्यात वाढ झाल्याने चाळीसगाव शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे तर दुसरीकडे गिरणा पट्ट्यातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

मजुरी, तणनाशकाचा खर्च वाढला

चाळीसगाव तालुक्यात मागील वर्षाच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. रिमझिम पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असले तरी शेतकऱ्यांचा मजुरी आणि तणनाशकाचा खर्च मात्र वाढला आहे. रिपरिप पावसामुळे पिकांसोबत तणाचेही प्रमाण वाढते. यामुळे शेतकऱ्यांना शेतातील तण काढण्यासाठी मजूर व तणनाशकाची गरज भासत आहे.

farmer
Eknath Khadse : अल्पसंख्याक तंत्रनिकेतनच्या कामातील त्रुटी तातडीने दूर करा : आमदार खडसेंची विधानपरिषदेत मागणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.