जळगाव : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या देशव्यापी ‘भारत जोडो’ पदयात्रेत जळगाव जिल्ह्यातून हजारो कार्यकर्त्यांचा सहभाग असेल. खानदेशच्या सीमेवरून जाणाऱ्या यात्रेचा हा टप्पा ऐतिहासिक ठरविण्याचा निर्धार जिल्हा काँग्रेसच्या शुक्रवारी (ता. २८) झालेल्या बैठकीत करण्यात आला.
जळगाव जिल्हा काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवारी काँग्रेस भवनात दुपारी जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. बैठकीत स्वत: श्री. पवार, आमदार चौधरी यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.(Thousands of activists go to participate Bharat Jodo Jalgaon News)
देशभरात मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने सामान्य नागरिकांचे जगणे कठीण केले आहे. एकीकडे महागाई वाढत असून, तरुणांच्या हाताला काम नाही. बेरोजगारीने कळस गाठल्यामुळे उपासमारीही वाढतेय. हे वातावरण बदलण्यासाठी राहुल गांधी यांनी देशव्यापी ‘भारत जोडो’ यात्रा सुरू केली असून, ही यात्रा विदर्भातून जळगाव, जामोद, शेगावमार्गे मध्य प्रदेशात जाणार आहे. त्यामुळे राहुल गांधींचे हे मिशन बळकट करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातून हजारो कार्यकर्त्यांनी यात्रेत सहभागी होत त्यांना बळ द्यावे, असे आवाहन प्रदीप पवार, आमदार चौधरी यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सदस्य नोंदणी अभियान
धरणगाव : येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाला शुक्रवारपासून (ता. २८) सुरवात करण्यात आली. सदस्य नोंदणी अभियानाची सुरवात माजी मंत्री तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांच्या हस्ते करण्यात आली. नुकतेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष यांच्या जळगाव जिल्ह्यात दौऱ्यात जे जास्तीत जास्त सभासद नोंदणी करतील त्यांनाच पक्षाची पदे दिली जातील, असे सूचना वजा तंबीच कार्यकर्त्यांना दिली होती.
त्यानुसार राष्ट्रवादीचे सभासद नोंदणी मोहिमेस उत्साहाने सुरवात झाली आहे. माजी नागराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, मोहन पाटील, तालुकाध्यक्ष धनराज माळी, कार्याध्यक्ष अरविंद देवरे, माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक वाघमारे, दिलीप धनगर, राष्ट्रवादी शहराध्यक्ष नीलेश चौधरी, युवक शहराध्यक्ष संभाजी कंखरे, सोशल मीडिया प्रमुख सागर वाजपेयी, किशोर भदाणे, नारायण चौधरी, सुरेश जाधव, पंकज पारधी, राज पारधी, साहेबराव पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्तित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.