Jalgaon News : ‘बॅकवॉटर’च्या गर्तेत अडकली हजारो हेक्टर्स शेती; विटवा निंबोल चे पुनर्वसन होईना

Thousands of hectares of agriculture got stuck in backwater jalgaon news
Thousands of hectares of agriculture got stuck in backwater jalgaon newsesakal
Updated on

Jalgaon News : गेल्या ४५ वर्षांत जवळपास प्रत्येक वर्षीच हतनूर मध्यम प्रकल्पाचे बॅकवॉटर तालुक्यातील विटवा आणि निंबोल गावाच्या सुमारे एक हजार हेक्टर्स शेती शिवारात येते आणि केळी, कपाशी, पेरू यासह पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते; मात्र वारंवार बाधित होणारी ही शेतजमीन शासन अधिग्रहितही करीत नाही आणि पिकांच्या होणाऱ्या नुकसानीची भरपाई ही देत नाही.

यामुळे दोन्ही गावातील शेतकऱ्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. १९७८ मध्ये तापी आणि पूर्णा नदीवरील हतनूर मध्यम प्रकल्पाचे काम पूर्ण झाले. मात्र पहिल्याच वर्षी आलेल्या पुरामुळे या भागातील पिकांची मोठी हानी झाली होती आणि घरांमध्येही पाणी शिरले होते.

तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी त्यावेळी या भागाची पाहणी करून गावात शेतकऱ्यांशी संवाद ही साधला होता. (Thousands of hectares of agriculture got stuck in backwater jalgaon news)

मात्र त्यानंतर ही शासनाच्या उदासीनतेमुळे विटवा आणि निंबोल या दोन्ही गावातील शेतकऱ्यांना असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या दोन्ही गावात ऐनपूर शेती शिवारातून पुराचे पाणी शिरते. ऐनपूर येथील शेतजमीन शासनाने अधिग्रहित केली आहे. मात्र अगदी शेजारी असलेल्या विटवा आणि निंबोल येथील शेत जमीन शासनाने वाऱ्यावर सोडली आहे.

निंबोल येथील घरांचे पुनर्वसन करण्यासाठी शासनाने रावेर रस्त्यावर जागा उपलब्ध करून दिली आहे. आता नवीन जागेत ८० ते ९० टक्के घरांचे पुनर्वसन झाले आहे तर विटवा येथील ग्रामस्थांनी पुनर्वसनासाठी नवीन जागा घेण्यास नकार दिल्याने त्यांना गावाबाहेर पडण्यासाठी उंचावरून सुरक्षित रस्ता शासनाने तयार करून दिला आहे.

परंतु या दोन्ही गावातील शेकडो एकर जमीन दरवर्षी बॅकवॉटरच्या पाण्याखाली जाते. निंबोल येथील १०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांची सुमारे ५०० हेक्टर इतकी शेतजमीन पाण्याखाली जाते. २४ तास किंवा त्यापेक्षा अधिक काळ पिके पाण्याखाली गेल्याने ती सडतात. पाणी उतरून गेल्यानंतरही त्याचा प्रभाव कायम राहतो आणि शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते.

आता सुदैवाने राज्याचे आपत्ती आणि पुनर्वसन मदत खात्याचे मंत्री अनिल पाटील हे जळगाव जिल्ह्यातील आहेत. त्यांनी या प्रकरणी तातडीने लक्ष देऊन या दोन्ही गावातील शेतजमीन अधिग्रहित करावी किंवा ज्यांचे नुकसान होते त्यांना भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

Thousands of hectares of agriculture got stuck in backwater jalgaon news
Gas Cylinder Safety Tips : गॅस सिलिंडर वापरताना दक्षता महत्त्वाची; गृहिणींनो, अशी घ्या काळजी...

"हतनूर प्रकल्पाच्या बॅक वॉटरमुळे जवळपास दरवर्षी आमच्या गावातील केळी आणि पेरू या पिकांचे मोठे नुकसान होते. मात्र शासकीय धोरणामुळे नुकसानीचे पंचनामे होत नाहीत किंवा भरपाई मिळत नाही." - जितू पाटील, माजी सभापती, पंचायत समिती, रा. निंबोल ता रावेर.

"माझ्या पाहण्यात गेल्या ४५- ते ५० वर्षांत अनेक वेळी पिकांच्या नुकसानीचे फक्त पंचनामेच झाले. मात्र शासन काडीचीही भरपाई देत नाही. यामुळे शेतकरी उद्विग्न झाले आहेत." - व्ही. जे. चौधरी, केळी उत्पादक शेतकरी, विटवा, ता रावेर.

सततच्या बॅकवॉटरमुळे विषारी वायूची समस्या

विटवा गावातील ११२२ एकर क्षेत्रापैकी निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे ६४३ एकर इतकी जमीन हतनूरच्या बॅकवॉटर मध्ये जाते. या दोन्ही गावाच्या शेती शिवारात १६ सप्टेंबरला पुराचे पाणी शिरले होते. विजेचे खांब बुडाले इतकी पाण्याची खोली होती. आता पाणी ओसरले असले तरीही चिकट गाळामुळे अजूनही शेतात चिखल आणि चिकट गाळ आहे.

त्यामुळे शेतात जाता येत नाही. या पाण्यामुळे परिसरातील विहिरींमधील वीजपंप पाण्यात बुडून नुकसान झाले आहे. सततच्या बॅकवॉटर पाण्यामुळे विहिरीतून विषारी वायू निघून मजूर मृत्यूची पडण्याच्या घटनाही येथे घडतात. मात्र शासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

Thousands of hectares of agriculture got stuck in backwater jalgaon news
Jalgaon News : सोनाळ्याच्या भूमिपुत्राने अमेरिकेत साकारले विठ्ठल मंदिर! संस्थानतर्फे न्यू जर्सित विविध उपक्रम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.