Jalgaon Agriculture News : केळीमालातून 3 टक्के सूट घेणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध कारवाई; केळी उत्पादकांना दिलासा

Banana News
Banana Newsesakal
Updated on

Jalgaon News : यापुढील काळात तालुक्यातील केळी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या केळीमालातून ३ टक्के सूट घेऊ नये आणि शेतकऱ्यांनी देखील ही सूट देऊ नये; असे आढळून आल्यास व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय शुक्रवारी (ता. ३०) येथे बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या सभेत घेण्यात आला.सभापती सचिन पाटील अध्यक्षस्थानी होते. (Three percent discount on banana products Action against taking traders Decisions in Raver Market Committee Meeting Relief to banana growers Jalgaon News)

गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यात केळी खरेदी विक्रीची ही पद्धत सुरू होती. शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना विकलेल्या केळीच्या एकूण वजनापैकी ३ टक्के मालाचे पैसे व्यापारी शेतकऱ्यांना देत नसत आणि शेतकरी ही विना तक्रार ३ टक्के कमी रक्कम स्वीकारत असत.

पूर्वी केळीची वाहतूक ही संपूर्ण घडाने व्हायची, त्यामुळे ट्रकमध्ये केळी भरताना वापरली जाणारी केळीची पाने आणि केळीच्या दंड्याचे वजन यामुळे ही ३ टक्के सवलत शेतकरी ही मान्य करीत असे.

मात्र अलीकडे केळी ट्रकमध्ये भरताना त्याच्या फण्या करून भरल्या जातात आणि केळीच्या पानांचाही फारसा वापर होत नाही. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ही सूट बंद करण्याची मागणी होत होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Banana News
Jalgaon News : महिलेला 42 व्या वर्षी मिळाले मातृत्व; GMC ची कामगिरी

आजच्या बैठकीत ज्येष्ठ संचालक योगीराज पाटील यांनी अशी सूट यापुढे व्यापारी बंधूंनी घेऊ नये आणि शेतकऱ्यांनीही ती देऊ नये; दिल्यास व्यापारांवर कठोर कारवाई करण्याचा प्रस्ताव मांडला त्याला उपसभापती योगेश पाटील यांच्यासह सर्वच संचालकांनी पाठिंबा दिला.

अशा प्रकारची सूट बंद करण्याचा निर्णय बाजार समितीने यापूर्वीही घेतला आहे. मात्र त्याची अंमलबजावणी झाल्याचे कधीही आढळून आले नाही. शेतकरीही व्यापाऱ्यांविरुद्ध तक्रार करीत नसत.

बाजार समितीच्या नवीन आणि युवा संचालक मंडळाने व पदाधिकाऱ्यांनी आता हा निर्णय घेतल्याने त्याची अंमलबजावणी होईल, असा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, आज बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांना ना नफा ना तोटा या तत्त्वावर बॅटरीवर चालणाऱ्या ५०० फवारणी पंपाचे वाटप करण्यात आले. बाहेर बाजारात सुमारे ४ हजार रुपये किंमत असलेला हा पंप शेतकऱ्यांना अवघ्या २२०० रुपयांत वितरण करण्यात आला.

Banana News
Jalgaon Water Supply : ऐन पावसाळ्यातही काही गावांना पाणीटंचाई

यापुढेही ज्या शेतकऱ्यांची मागणी असेल त्या सर्वांना बाजार समितीचे वतीने पंप देण्यात येतील, असे सचिन पाटील यांनी सांगितले. आगामी आठवड्यात शेतकऱ्यांसाठी ना नफा ना तोटा याच पद्धतीने ताडपत्रीचे ही वितरण केले जाणार आहे तसेच आगामी काळात माती आणि पाणी परीक्षणासाठी ही शेतकऱ्यांना सहकार्य केले जाणार असल्याचे सचिन पाटील यांनी सांगितले.

बैठकीला डॉ. राजेंद्र पाटील, गणेश महाजन, मंदार पाटील, पितांबर पाटील, जयेश कुयटे, राजेंद्र चौधरी, प्रल्हाद पाटील, पंकज पाटील, मनीषा पाटील, सविता पाटील, विलास चौधरी, रोहित अग्रवाल, सिकंदर तडवी, यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते. बाजार समितीचे सचिव गोपाळ महाजन यांनी आभार मानले.

..तर परवाना रद्द

तीन टक्के सूट घेणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध संबंधित केळी उत्पादक शेतकऱ्याने तक्रार केल्यास त्या व्यापाऱ्याचा केळी खरेदी-विक्री करण्याचा परवाना बाजार समिती रद्द करू शकते तसेच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई ही केली जाऊ शकते, अशी तरतूद बाजार समितीच्या नियमांत आहे.

Banana News
Jalgaon Agricultural Update : पावसाच्या भरवशावर जिल्ह्यात पेरण्यांना सुरवात; जमिनीत केवळ 3 इंच ओल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.