Jalgaon Crime News : कासवाची तस्करी करणाऱ्या तिघांना कासवासह अटक

अघोरी कृत्यासाठी कासवांची तस्करी करणाऱ्या तिघांना नशिराबाद येथून वन विभागाने अटक केली.
Three arrested in turtle smuggling case
Three arrested in turtle smuggling caseesakal
Updated on

Jalgaon Crime News : अघोरी कृत्यासाठी कासवांची तस्करी करणाऱ्या तिघांना नशिराबाद येथून वन विभागाने अटक केली. संजय श्रावण कोळी, भूषण संजय कोळी व अकबर अली मेहमूद अशी संशयितांची नावे आहेत.

प्रतिबंधित असलेल्या कासवांची विक्री होणार असल्याची गुप्त माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानुसार नशिराबादच्या तिघांवर पाळत ठेवण्यात आली होती. (Three turtle smugglers arrested jalgaon crime news)

Three arrested in turtle smuggling case
Mumbai Crime News : मुंबईतील अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाला धमकीचा मेल, एफआयआर दाखल

तिघेही संशयित कासव विक्रीसाठी आले असताना वन विभागाच्या पथकाने त्यांच्यावर झडप घालत तीन कासवांसह ताब्यात घेतले.

वन विभागाचे उपसंचालक योगेश वरकड, उपवनसंरक्षक प्रवीण ए., सहाय्यक वनसंरक्षक यू. एम. बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली फिरत्या पथकातील वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन जाधव, नितीन बोरकर, वनपाल योगेश दीक्षित.

संदीप पाटील, वनरक्षक भागवत तेली, अजय रायसिंग, हरीश थोरात, दीपक पाटील, गुलाबसिंग ठाकरे, वाहनचालक भगवान चिम अशांच्या पथकांनी कारवाई केली. नशिराबादच्या तीन संशयितांविरोधात वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. वनकोठडीत त्यांची रवानगी करण्यात आली.

Three arrested in turtle smuggling case
Pune Crime News : शरद मोहोळ याच्या पत्नीला धमकवणारा आरोपी ससून रूग्णालयातून फरार; पोलीस दलात खळबळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.