Jalgaon News: ...तर महापालिका 90 लाख ‘महावितरण’ला देणार : आयुक्त डॉ. गायकवाड

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporationesakal
Updated on

Jalgaon News : रस्त्याला अडथळा ठरणारे खांब बदलण्यासाठी महापालिकेतर्फे ‘महावितरण’ला ९० लाख रुपये देण्यात येतील. तसेच, रस्त्यात साठणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी रस्त्यावर ‘मार्किंग' करण्याचे आदेश शहर अभियंत्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी दिली.

शहरातील रस्त्याचे काम ‘मार्किंग’नुसार न झाल्याने पाण्याचा निचरा होत नाही. रस्त्यावर पाणी साचून राहत असल्याने वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. (To replace pillar obstructing road Municipal corporation will give 90 lakhs to Mahavitaran jalgaon news)

त्यामुळे रस्त्याचे काम ‘मार्किंग’नुसार करावे, असे पत्र माजी नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी महापालिका आयुक्तांना नुकतेच दिले होते. त्यांनी रस्त्याचा संपूर्ण नकाशा दिला होता.

त्याची दखल डॉ. गायकवाड यांनी घेतली. शहरातील रस्त्यावर ‘मार्किंग’नुसार काम करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. शहरातील रस्त्याला अडथळा ठरणारा विजेचा खांब व ट्रान्स्फॉर्मर स्थलांतरित करण्यासाठी महापालिका ‘महावितरण’ला ९० लाख रुपये देईल. त्यात शहरातील रथ मार्गावरील खांब स्थलांतरित करण्यासाठी ३० लाख रुपये, इतर भागातील खांब स्थलांतरासाठी ६० लाख रुपये खर्च करण्यात येतील.

भुयारी गटारी जानेवारीत कार्यान्वित

शहरातील भुयारी गटारीचा प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी आता वीजजोडणीचे काम सुरू आहे. जानेवारी २०२४ मध्ये हा प्रकल्प सुरू होईल.

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon News : 2 वर्षांत 67 प्रेमीयुगल झाले भुर्रर्र...! वाढत्या घटनांमुळे पालक चिंताग्रस्त

त्यावेळी शहरातील भुयारी गटारींची चेबरला जोडणी करण्यात येईल. त्यासाठी महापालिकेतर्फे प्रशिक्षित प्लंबर्स नियुक्त केले जातील. नागरिकांनी त्यांच्याकडून ही जोडणी करून घ्यावयाची आहे.

‘टी' आकारासाठी मंत्रिस्तरावर बैठक

शिवाजीनगर उड्डाणपुलावर ‘टी' आकार करण्यासाठी मंत्रिस्तरावर बैठक होईल. त्यासाठी तीन पर्याय आहेत. यातील एक पर्याय ‘टी' आकार करणे, दुसरा पर्याय म्हणजे पिंप्राळ उड्डाणपुलापासून शहराबाहेरून होत असलेल्या मार्गाला रस्ता जोडणे, तिसरा पर्याय म्हणजे, शिवाजीनगर पुलापासून समांतर ममुराबाद रस्त्याला जोडणे. या तीन पर्यायांवर चर्चा होईल, असेही आयुक्तांनी सांगितले.

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipality News: जळगाव महापालिकेमधील अधिकारी-कर्मचारी बदल्या; प्रशासकीय कार्यकाळात प्रथम मोठे फेरबदल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()