Jalgaon News : पृथ्वीभोवती २७६०० किलोमीटर प्रतितास इतक्या प्रचंड वेगाने फिरणारे इंटरनॅशन स्पेस स्टेशन बघण्याची संधी शुक्रवारी (ता. १२) खगोलप्रेमींना मिळणार आहे. (Today opportunity to see space station in space jalgaon news)
सायंकाळी आकाशात एक चांदणी एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे वेगाने जाताना दिसेल. या अद्भूत नजाऱ्याची सुरवात सायंकाळी सात वाजून ५९ मिनिटांनी दक्षिण- पश्चिम दिशेच्या मधून होईल आणि स्पेस स्टेशन पूर्व- उत्तर दिशेकडे वेगाने जाताना दिसेल.
रात्री आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत ते आपल्याला ते दिसत राहील. आकाशात ते जवळ जवळ सहा मिनिट ३७ सेकंद दिसेल. त्याचा ठळकपणा हळूहळू वाढत जाईल. आपल्या डोक्यावर आल्यावर त्याचा ठळकपणा सर्वांत जास्त -४.२ असेल.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
आपल्याला शुक्र ग्रह जसा तेजस्वी दिसतो साधारण तितके तेजस्वी स्पेस स्टेशन चांदणीच्या स्वरूपात दिसेल. प्रत्येक शहरानुसार त्याचा ठळकपणा थोडा कमी- जास्त असेल, पण सर्वांना स्पष्टपणे दिसेल. सर्वांनी हा अदभूत नजारा बघण्याचा अवश्य प्रयत्न करावा, असे आवाहन खगोल अभ्यासक अमोघ जोशी यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.