Jalgaon Crime News : मुख्याध्यापक पतीकडून विवाहितेचा छळ

torture of wife by principal husband jalgaon crime news
torture of wife by principal husband jalgaon crime newsesakal
Updated on

Jalgaon Crime News : सायगाव येथील ४७ वर्षीय विवाहितेचा पतीसह सासरच्या मंडळींनी छळ केल्याची तक्रार महिलेने येथील पोलिसात दिली आहे.

या प्रकरणी जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक असलेल्या पतीसह मुलगा, जेठ, नणंद अशा पाच जणांविरोधात मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (torture of wife by principal husband jalgaon crime news)

सुरत येथील माहेर असलेल्या व सायगाव (ता. चाळीसगाव) येथील सासर असलेल्या ४७ वर्षीय विवाहितेची सासरची परिस्थितीत सधन आहे.

पती जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक आहे. तर घरची ४० एकर शेती आहे. असे असूनही या विवाहितेचा छळ सुरू होता. मुलानेही आपल्या वडिलांचे ऐकून आईचा छळ केला.

या प्रकरणी विवाहितेने पोलिसात तक्रार केली होती. विवाहिता आजारी पडली असताना देखील तिला दवाखान्यात नेले नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

torture of wife by principal husband jalgaon crime news
Jalgaon Crime News : बंद घरातून 6 लाखांचा ऐवज लंपास

ट्रॅक्टर घेण्यासाठी ५ लाख रूपये आणले नाही तर कायमची टाकून घालेल, अशी धमकी देत विवाहितेला घराबाहेर काढून दिले. जळगावच्या महिला दक्षता समितीकडे तक्रार करूनही पतीने नांदवण्यास नकार दिला.

अखेर जाच असह्य झाल्याने ४७ वर्षीय विवाहितेने मेहुणबारे पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून मुख्याध्यापक पतीसह मुलगा, दोन जेठ, नणंद अशा पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

torture of wife by principal husband jalgaon crime news
Jalgaon Crime News : सोशल मिडीयावर आक्षेपार्ह व्हिडीओ टाकणे अंगलट; वकिलाविरूद्ध गुन्हा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.