जळगाव : महापालिकेच्या नगररचना विभागात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज काही लोकप्रतिनिधींच्या मोबाईलमध्ये असून, त्या ठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्यावर त्या माध्यमातून नजर ठेवली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
महापालिकेत पंधराव्या मजल्यावर नगररचना विभाग आहे. त्या विभागात शहरातील बांधकाम मंजुरी दिली जाते, तसेच पूर्णत्वाचा दाखलाही दिला जातो. या विभागातून मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते. त्यामुळे या विभागाकडे अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांचेही लक्ष असते. गेल्याच आठवड्यात जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी, महापालिकेतील पदाधिकाऱ्यांचे लक्ष शहराच्या विकासावर नव्हे, तर पंधराव्या मजल्यावर अधिक असते, असा आरोप केला होता. त्यामुळे जळगावकर जनतेतही या पंधराव्या मजल्याबाबत उत्सुकता आहे.(Town Planning Department municipal corporation 15 floor to strict watch by cctv jalgaon news)
सीसीटीव्ही कुणाच्या मोबाईलमध्ये?
महापालिकेच्या पंधराव्या मजल्यावर नगररचना विभागाचे कार्यालय आहे. या विभागातून शहरातील बांधकाम करण्याचे व बांधकाम पूर्ण झाल्याचे दाखले दिले जातात. या विभागातून मोठ्या प्रमाणात व्यवहार होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या विभागाचे अधिकारी कोणत्या फायलीवर स्वाक्षरी करतात, त्याला मंजुरी देतात याकडे अधिक लक्ष असते. महापालिकेत सर्वच विभागांत सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. त्यांचे फुटेज आयुक्तांच्या दालनात आहे, तसेच तळमजल्यावर सुरक्षारक्षकांच्या केबिनमध्येदेखील आहे. विशेष म्हणजे पंधराव्या मजल्यावरील फुटेज काही पदाधिकारी व नगरसेवकांच्या मोबाईलमध्ये असल्याबाबत शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे नगररचना विभागात कोण व्यक्ती आली, कोणत्या फायलीची मंजुरी मिळाली यावर लक्ष ठेवून संबंधितांना संपर्क करण्यात येत असल्याबाबतही चर्चा आहे. कारण काही बांधकाम व्यावसायिक पंधराव्या मजल्यावर आल्यास नंतर त्यांना संपर्क करण्यात येत असल्याबाबतही सांगण्यात येत आहे. मात्र त्याबाबत कुणीही समोर येऊन माहिती देण्यास तयार नाही. या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज पदाधिकारी किंवा नगरसेवकांच्या मोबाईलमध्ये असावे, असा संशय व्यक्त होत आहे.
यापूर्वीही असा प्रकार
महापालिकेत पंधराव्या मजल्यावर असलेल्या ‘सीसीटीव्ही’चे फुटेज पदाधिकारी व नगरसेवकाच्या मोबाईलमध्ये असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र याला आधार असल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी या विभागातील फुटेज पदाधिकारी व नगरसेवकांच्या मोबाईलमध्ये होते. त्याची माहिती मिळाल्याने तत्कालीन आयुक्तांनी कारवाई करून हे फुटेज बंद केले होते, अशी माहितीही मिळाली. आता पुन्हा हे फुटेज मोबाईलमध्ये असल्याबाबत चर्चा महापालिकेत सुरू आहे. मात्र त्याबाबत कोणीही पुढे येऊन माहिती देण्यास तयार नाही; परंतु आयुक्तांनी याबाबत तपास करून कारवाई करावी, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.
"महापालिकेचा पंधरावा मजला प्रभावशाली नगरसेवकांच्या व पदाधिकाऱ्यांच्या आधिपत्याखाली आहे. अनेक अधिकाऱ्यांचीही ‘मिलीभगत’ असल्याने त्या माध्यमातून या ठिकाणी मोठी आर्थिक उलाढाल होत असते. त्यामुळे ही साखळी तोडण्याची गरज आहे. त्याकरिता ही यंत्रणा तातडीने ऑनलाइन करण्याची गरज आहे."
डॉ. राधेश्याम चौधरी, भाजप, जिल्हा सरचिटणीस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.