Jalgaon Crime News : वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

sand transportation in jalgaon
sand transportation in jalgaonesakal
Updated on

Jalgaon Crime News : शहरातील मेहरूण तलाव काठाला लागूनच जैन गेट जवळून विनापरवाना ट्रॅक्टर मधून वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर मेहरुण तलाठी यांनी पकडले.

एमआयडीसी पोलिस ठाण्यात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Tractor carrying sand were seized by MIDC police jalgaon crime news)

मेहरूण तलावाच्या बाजूला असलेल्या जैन यांच्या गेटजवळून ट्रॅक्टर मधून विनापरवाना वाळू वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती तलाठी राहुल सुभाष कुमावत यांना मिळाली.

त्यानुसार त्यांनी पथकासह शनिवार (ता. ४) दुपारी १ वाजता कारवाई केली. ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९- १९०९) या निळ्या रंगाच्या ट्रॅक्टरमधून वाळू वाहतूक करत असल्याचे आढळून आले.

sand transportation in jalgaon
Jalgaon Crime News : बसमध्ये चढतांना पर्समधून ऐवज लंपास

वाळूने भरलेले ट्रॅक्टर महसूल पथकाने जप्त केले. याप्रकरणी ट्रॅक्टर चालक योगेश रामचंद्र कोळी (रा. रामेश्वर कॉलनी मेहरुण), अनिल बुधा सोनवणे (रा. नागझिरा ता.जळगाव), प्रेम महारु जाधव (रा. रामेश्वर कॉलनी) आणि रवींद्र सोमा चौधरी (रा. आदर्श नगर, जळगाव) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस नाईक नितीन पाटील तपास करीत आहेत.

sand transportation in jalgaon
Jalgaon Crime News : दरोड्याच्या गुन्ह्यात 5 वर्षांपासून फरारी संशयिताला अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.